शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धुळे महापालिकेच्या चुकीमुळे गाळेधारकांना सेवाकराचा एकदम भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 18:51 IST

२०१२-१३ पासूनची थकबाकी करणार वसुल, जीएसटीचाही भार

ठळक मुद्दे-२९ लाख रूपयांच्या थकीत सेवाकर वसुलीचे मनपासमोर आव्हान-रेडीरेकनर दर, सेवाकर, जीएसटीमुळे गाळेधारकांना मोठा फटका-दुकान भाडे व कराच्या आकारणीमुळे मागणीत दुप्पट वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील मनपा मालकीच्या व्यापारी संकुलांमधील गाळेधारकांना २०१२ पासून सेवा कराची आकारणी करण्याचे आदेश केंद्रीय विक्रीकर नाशिक विभागाने दिले आहे़ त्यानुसार मनपाने गाळेधारकांना चालू वर्षाच्या बिलात जीएसटीसह २०१२ पासूनच्या सेवाकराची आकारणी सुरू केली आहे़ त्यामुळे गाळेधारकांना चांगलाच भुर्दंड बसणार आहे़राज्यातील बहूतांश मनपांकडून गाळेधारकांना सेवा कराची आकारणी होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते़ त्यामुळे संबंधित आदेश गेल्यावर्षीच काढण्यात आल्याचे बाजार विभागाने स्पष्ट केले आहे़ बाजार विभागाकडून गाळेधारकांना बिलांचे वितरण नुकतेच पूर्ण झाले असून त्यानंतर आता तक्रारी येण्यास सुरूवात झाली आहे़ बाजार विभागाने दिलेल्या बिलांमध्ये दुकान भाडे, शास्ती, सेवा कर, एज्युकेशन सेस, स्वच्छ भारत सेस, कृषी कल्याण सेस, सीजीएसटी व एसजीएसटी इतके कर आकारण्यात येत आहे़ महापालिकेने आकारलेला सेवाकर शासनजमा करावा लागतो़ मात्र मनपाने सेवाकर वसुल न केल्यामुळे २९ लाख ८१ हजार २३३ रूपये वसुल करून त्याचा शासनाकडे भरणा करावा लागणार आहे़ महापालिकेने ११ फेब्रुवारी २०१६ ला महासभेत केलेल्या ठरावानुसार गाळेधारकांना रेडीरेकनर दरानुसार भाडे आकारणी करण्यास सुरूवात झाली आहे़ महापालिकेला जकात कर, पारगमन शुल्क, एलबीटीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने मनपाने स्वमालकीच्या गाळयांना रेडीरेकनर दरानुसार एकरकमी डिपॉझिट व भाडेआकारणी करण्याचा निर्णय घेतला होता़ त्यामुळे मनपाच्या दुकान भाडे मागणीत मोठी वाढ झाली आहे़ शासनाने १ जुलै २०१७ पासून जीएसटीची आकारणी सुरू केली आहे़ त्यानुसार दुकान भाड्यावर देखील १८ टक्के जीएसटीची आकारला जात आहे़ त्यात ९ टक्के सीजीएसटी असून ९ टक्के एसजीएसटी आहे़  दुकान भाड्यातून मिळणारा जीएसटी शासनजमा केला जाणार आहे़