शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

दरडी कोसळल्याने वाहतुकीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:56 IST

चांदसैली घाट : धुक्यामुळे घाटातील प्रवास जिकिरीचा, उपाययोजनांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात धोकेदायक असणाºया चांदसैली घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यातच धुक्यांमुळे या घाटातील प्रवास सध्या अधिकच जिकरीचा झाला आहे. चांदसैली मार्ग हा धडगावला जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा सर्वात कमी अंतराचा मार्ग आहे. त्यामुळे तळोदा, नंदुरबार, परिसरातील वाहनधारक धडगावला जाण्यासाठी चांदसैली घाटमार्ग जाणे अधिक पसंत करतात. या मार्गाने वेळेसह पैशांचीही बचत होते. शिवाय सातपुड्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागाला जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडणारा चांदसैली घाट हा महत्त्वाचा दुवा आहे. यामुळे दिवसभर या घाटात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.मागील आठ ते दहा दिवसापासून सातपुड्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. दरवर्षाप्रमाणे या घाटात दरडी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. परंतु मागील दोन वर्षापेक्षा या वर्षी घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्याभरात चांदसैली घाटात पाच ते सहा ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. दरडी कोसळल्याने घाटातील रस्त्यांच्या कडेला माती व दगडांचा ढिगारा साचला असून, अनेक ठिकाणी कोसळलेल्या दरडीचे ढिगारे रस्त्यांवर पसरले असून, अर्धा रस्ता साकला गेलेला आहे. आधीच घाटात रस्ता अरूंद व त्यातच रस्त्यावर साचलेल्या मातीच्या ढिगाºयांमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करीत घाटातून वाहने चालवावी लागत आहे. अनेक ठिकाणी मातीच्या ढिगाºयांमुळे रस्त्यावर चिखल निर्माण झाला असल्याने दुचाकी घसरण्याचे प्रकारही घडत आहेत.या प्रकारांमुळे घाटातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्याचप्रमाणे मागील दोन दिवसात चांदसैली घाट परिसरात पावसाने जोरदार  हजेरी लावल्याने घाटात दिवसभर दाट धुके दिसून येत आहे. या धुक्यांमुळे घाटातील रस्ता हरवल्यासारखी स्थिती निर्माण होते. अगदी पाच ते सहा फुटांवरील वाहनेदेखील नजरेस दिसून येत नाही. आधीच या घाटात ठिकठिकाणी दरडींमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने त्यात दाट धुक्यांची भर झाल्याने घाटातून प्रवास करणे जिकरीचे ठरत आहे.त्यामुळे संबंधित विभागाने घाट रस्त्यावर कोसळलेल्या मातीचे ढिगारे हटविण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे घाटातून प्रवास करताना वाहनधारकांना मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे.घाटात सुरक्षा कठडेचांदसैली घाटात अनेक ठिकाणी संरक्षक कठडे बसवायची गरज असून, संरक्षक कठड्यांअभावी प्रवाशांचा जीव टांगणीला असतो. या विषयी ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून संरक्षक कठड्यांची मागणी लावून धरल्यामुळे चांदसैली घाटात ठिकठिकाणी नव्याने संरक्षक कठडे बसविण्यात आले आहेत.