शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला येण्यास होतोय उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 12:42 IST

शहीद योगेश भदाणेंवर आज सायंकाळी अंत्यसंस्कार, खलाणे गावात अनेकांची राहणार उपस्थिती

ठळक मुद्देखराब हवामानामुळे शहीद योगेश याचे पार्थिव येण्यास उशीरबाहेरगावाहून आलेल्या नागरिकांसाठी ग्रामस्थांकडून जेवणाची सोयखलाणे गावावर अद्यापही दु:खाचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : शहीद जवान योगेश भदाणे यांचे पार्थिव सोमवारी जम्मू काश्मिर येथून हेलिकॉप्टरने सकाळी निघणार होते़ पण, खराब हवामानामुळे थोडा उशीर होत आहे़ अडथळे पार करीत हेलिकॉप्टर निघाले असून शिंदखेडा तालुक्यातील खलाणे या गावी दुपारपर्यंत पोहचेल़ दुपारी ४ वाजेपर्यंत अंत्यसंस्कार होतील अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांनी दिली़ दरम्यान, बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांसाठी खलाणे ग्रामस्थांनी जेवणाची व्यवस्था केली आहे़  जम्मू-काश्मिर येथे पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथील जवान योगेश मुरलीधर भदाणे (२८) हे शहीद झाले़ या वृत्तामुळे खलाणे गावात शोककळा पसरली़ गावात ठिकठिकाणी त्याच्या येण्याची वाट पाहणारी मंडळी सकाळपासून थांबून आहे़ चौका-चौकात देशभक्तीपर गीते वाजविली जात आहेत़ त्यांच्या अंत्यविधीची तयारी खलाणे गाव आणि प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे़ गावालगत वायपूर रस्त्यावर असलेल्या बिसा भिकन फकीर यांच्या शेतजमिनीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले़ शहीद योगेश भदाणे यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने खलाणे गावात दुपारी आल्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील़ यावेळी राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, जिल्हाधिकारी डॉ़ दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, शिंदखेड्याचे तहसीलदार सुदाम महाजन, खलाणेचे सरपंच भटू वाघ यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ग्रामस्थ सहभागी होणार आहेत़