शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अत्यल्प पावसामुळे दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 12:12 IST

वारुड परिसर : येत्या काही दिवसात पावसाची नितांत आवश्यकता, शेतकरी चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कवारुड : शिंदखेडा तालुक्यातील वारूड परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकºयांसमोर निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसात पावसाची नितांत गरज आहे.वारूडसह परिसरातील मेलाणे, जातोडे, पाष्टे, मुडावद, म्हळसर या गावात जून महिन्याच्या शेवटच्या आठवडयात अत्यल्प अशा पावसाने हजेरी लावली. या पावसाचे प्रमाण हे खूप कमी असल्याने हवी त्या प्रमाणात जमीन ओली झाली नाही. तरीही शेतकºयांनी पुढे चांगला पाऊस येईल, या आशेने खरीप हंगामाच्या पेरणीला वेग देत कापसासह कडधान्याची पेरणी केली. मात्र, त्यानंतर हवा तसा पाऊस न झाल्याने पिकांची परिस्थिती नाजूक बनली आहे. तसेच कोवळ्या पिकांना कीड खाऊ लागली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पावसाची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा शेतकºयांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे.शेतकºयांनी खरीप हंगामासाठी विविध कार्यकारी सोसायटी, बँकेचे कर्ज, काहींनी लोकांकडून उसनवार पैसे घेऊन महागडी बियाणे घेत पेरणी केली. मात्र, आता वरुणराजाने पाठ फिरविल्यामुळे परिसरातील शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. पेरणीनंतर परिसरात पाऊस अत्यल्प आल्यामुळे जमिनीतील बियाणे कीड खाऊ लागली आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात पावसाने हजेरी लावली नाही तर परिसरातील शेतकºयांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागेल, अशी प्रतिक्रिया परिसरातील शेतकºयांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे