शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

वाहन अपघात प्रकरणी चालकास सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 11:26 IST

दोंडाईचा न्यायालयाचा निर्णय : एकाचा मृत्यू तर चौघे झाले होते जखमी

दोंडाईचा :  दोंडाईचा-शहादा रस्त्यावर रस्त्याच्या परिस्थितीचा विचार न करता भरधाव वेगाने वाहन चालवून एकाच्या मृत्यूस व चार जणांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकास सहा महिन्यांची शिक्षा व चार हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा  ठोठावण्यात आली. येथील न्यायालयाने नुकताच हा निर्णय दिला.दोंडाईचा -शहादा रस्त्यावर २८ मार्च २०१९ रोजी शहादा तालुक्यातील गणेश नगर येथील ज्ञानेश्वर रतन पाटील या संशयित आरोपीने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवले,रस्त्याचा परिस्थितिचा विचार न करता वाहन भरधाव वेगाने चालवले, त्यात ते वाहन पलटी झाले .वाहन पलटी केल्यामुळे  मिनिडोअर वाहनातील प्रवाशी सुभाष राजाराम सोनार यांचा मृत्यू झाला. तर अन्य चार प्रवासीही या घटनेत गंभीर जखमी झाले होते. संशयित आरोपी ज्ञानेश्वर रतन पाटील याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ अ-सदोष मानव वध, २७३, ३३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचे कामकाज     येथील न्यायालयासमोर चालविण्यात आले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता दयाराम सुरेश पाटील यांनी जोरदार युक्तिवाद केला. आरोपीच्या वकिलांनीही युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून हा निर्णय दिला. या खटल्यात न्यायाधीश सुमित राठोड  यांनी संशयित आरोपी ज्ञानेश्वर रतन पाटील यांस विविध कलमान्वये दोषी ठरवून सहा महिन्यांची शिक्षा व चार हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा ठोठावली, अशी माहिती सहाय्यक सरकारी अभियोक्ता दयाराम पाटील यांनी दिली.

टॅग्स :Dhuleधुळे