शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कालीपिवळीधारकाकडून बस चालकास मारहाण, कर्मचाऱ्यांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 13:33 IST

दोंडाईचा : बस स्थानकासमोरील घटना, गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांचे आश्वासन

दोंडाईचा : बस स्थानकासमोर रविवारी सकाळी दोंडाईचा - पुणे बस चालकास खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कालीपिवळीधारकाने मारहाण केली. त्या घटनेचा निषेध म्हणून एस.टी.कामगार संघटनेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. शेवटी मारहाण करणाºयाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, जखमी बस चालकावर धुळ्यात उपचार सुरु आहे.दोंडाईचा बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर बस वळवितांना रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास दोंडाईचा - पुणे (बस क्रमांक २०७२) बस चालक आर.एम.शिरसाठ यांचे बाहेर उभ्या असलेल्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाºया गाडयाच्या चालकाशी वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि खाजगी प्रवासी वाहतूकदारांनी बस चालकाला मारहाण केली. त्यात शिरसाठ जखमी झाले.त्यांना उपचारासाठी आधी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी धुळे येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात पाठविण्यात आले. त्याठिकाणी शिरसाठ यांच्यावर उपचार सुरु आहे.रास्तारोकोदरम्यान, बस चालकास मारहाण झाल्याचे कळाल्यावर आगारात उपस्थितीत कर्मचाºयांनी बसेस थांबवून स्थानकाबाहेर रास्तारोको आंदोलन सुरु केले. घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा आगार प्रमुख ए.आर.चौरे या घटनास्थळी पोहचल्यात. त्यांनी कर्मचाºयांशी चर्चा केली. त्यानंतर उपस्थित पोलीस अधिकाºयाशी चर्चा केली. आंदोलनामुळे सुमारे अर्धा वाहतूक खोळंबली होती.बस स्थानक रस्त्यावर थेट नंदुरबार चौफुलीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच बस स्थानकात सुद्धा बस आहे त्याचठिकाणी उभ्या करण्यात आल्या होत्या. चर्चेअंती पोलिसांनी एस.टी. कामगार संघटनेच्या पदाधिकाºयांना बस चालक शिरसाठ यांना मारहाण करणाºयाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर एस.टी.कर्मचाºयांनी आपले रास्तारोको आंदोलन मागे घेतले.आंदोलन मागे घेतल्यानंतर बस वाहतूक आणि रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली होती. सुमारे अर्धा तास वाहतूक यावेळी ठप्प झाली होती.बस चालक आर.एम.शिरसाठ यांच्यावर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांनी फिर्याद दाखल केल्यावर मारहाण करणाºया लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Dhuleधुळे