शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशसाठी स्वप्नपूर्तीचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 12:02 IST

मुख्यमंत्री : धुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार

धुळे - आजचा दिवस खान्देशाच्या स्वप्नपूर्तीचा आहे. धुळे - नरडाणा रेल्वेमार्ग आणि सुलवाडे - जामफळ सिंचन योजनेमुळे धुळे जिल्ह्याचा विकास होणार आहे. मुंबई - दिल्ली कॉरिडोर प्रकल्पामुळे धुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. आघाडी सरकारने ६० वर्ष केवळ चर्चा केली. मात्र आम्ही तो प्रत्यक्षात साकार करणार आहोत. दुष्काळाची परिस्थिती असतांना पंतप्रधानांनी राज्याच्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत सांगितले.धुळेकरांचे मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला धुळे महापालिकेत सत्ता मिळवून दिली. मी महापालिकेच्या निवडणुकीत आश्वासन दिले होते. त्याची पूर्ती करीत तीन महिन्यात अक्कलपाडा ते धुळे पाईप लाईन टाकण्याची योजनेचे आज भूमीपूजन केले. याशिवाय शहरातील रस्त्यासाठी १०० कोटी आणि भुयारी गटारीची योजनाही मंजूर करुन चार महिन्यात ५०० कोटीचा निधी धुळे महानगरपालिकेला उपलब्ध करुन दिल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.खान्देशाचा मुकुटमणी४गुजरात व मध्य प्रदेश राज्यांसाठी धुळे जिल्हा हा महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे. या जिल्ह्यातून सात राष्ट्रीय महामार्ग जातात. सात राष्ट्रीय महामार्ग जाणारा हा देशातील एकमेव जिल्हा असावा. येथे लॉजिस्टिक हब तयार होवू शकेल, प्रधानमंत्री यांनी धुळे शहराची क्षमता ओळखली. आगामी काळात मुंबई-दिल्ली कॉरिडॉर हा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच रेल्वे, महामार्ग, पाण्याची उपलब्धता यामुळे या शहराचा आगामी काळात चेहरा- मोहरा बदलेला दिसेल.

टॅग्स :Dhuleधुळे