शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेडा येथे नाट्यछटा अविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 22:15 IST

प्रविण माळींचा एकपात्री प्रयोग : अहिराणी बोली भाषेचा आदर करा; क्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त येथील माळी वाड्याच्या जयंती उत्सव समितीतर्फे शिरपूरच्या प्रविण माळी यांच्या एकपात्री मनोरंजनातून समाजप्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सुदाम महाजन होते.महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेषातील मृण्मयी संजयकुमार महाजन आणि रंजना ज्ञानेश्वर गवळे यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी प्रविण माळी यांनी ‘आयतं पोयतं सख्यानं’ हा एकपात्रा नाट्याविष्कार सादर केला. कार्यक्रमास महिलावर्गासह तीन हजार नागरिक उपस्थित होते.लग्नसमारंभा दरम्यान मुलगी बघायला जाण्यापासून मुलीच्या विदाई कार्यक्रमापर्यंत घडणाऱ्या विविध प्रसंग, घटना अहिराणी भाषेत खुमासदार शैलीत प्रविण माळी यांनी सादर केले. या बाबी सादर करताना त्यांनी तरुणांचे बेजबाबदार वर्तन, व्यसनाधिनता, मोबाईचा अतिरेकी वापर यावर परखडपणे विनोदी शैलीत भाष्य केले. फुले दाम्पत्याच्या कार्याचा परिचय करुन दिला. विनोदी शैलीतील हा कार्यक्रम अडीच तासापर्यंत रंगला. तहसीलदार महाजन यांनी अहिराणी बोली भाषेला आदर करण्याचे आवाहन केले. विविध सण समारंभातील अहिराणी गितांचा संग्रह पुढील पिढीने जनत करावा, असे आवाहन केले. यावेळी गावातील विविध शाळांमधून सावित्रीबाई फुले यांच्या विषयी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद जाधव, मुन्ना माळी, संदीप माळी, केशव माळी, सतिष माळी, विनोद माळी, भूषण माळी, सुखदेव माळी, हर्षल माळी, निलेश माळी, कल्पेश माळी, विजय माळी, चेतन माळी, जयेश माळी, कुणाल सोनवणे, अविनाश माळी, प्रविण माळी, ईश्वर माळी यांनी परिश्रम घेतले.त्यांना विजय जाधव, संजय महाजन, प्रा.दीपक माळी यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Dhuleधुळे