शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

धुळे शहरात विसर्जन मिरवणूक मार्गावर खड्ड्य़ांचे विघ्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 11:40 IST

खड्ड्यांमुळे अपघाताची भीती, महानगरपालिकेने रस्त्याची डागडुजी करण्याची आवश्यकता

ठळक मुद्देशहरात उद्या निघणार विसर्जन मिरवणूकविसर्जन मिरवणुकीच्या रस्त्यावर अनेक खड्डे

आॅनलाइन लोकमतधुळे : जल्लोषात स्वागत करण्यात आलेल्या गणरायाला आता निरोप देण्याची वेळ आलेली आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. यानिमित्त सार्वजनिक मंडळांतर्फे मिरवणुका काढण्यात येणार आहेत. मात्र ज्या मार्गावरून विसर्जन मिरवणुका मार्गस्थ होणार आहे, त्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी पाण्याचे व्हॉल्व्ह उघडे आहेत. इलेक्ट्रीक वायरी लोंबकळलेल्या आहेत.संबंधित विभागाने रस्ता दुरूस्तीकरून विसर्जनाचा उत्साह वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार असून या मार्गाची पहाणी ‘लोकमत’ प्रतिनिधीने केली असता, त्यात वरील समस्या आढळून आली.महाराष्टÑाचं आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे गेल्या सोमवारी जल्लोषात आगमन झाले होते. या दहा दिवसाच्या कालावधीत अनेक मंडळांनी विविध उपक्रम राबवून या उत्सवात रंगत आणली होती. आता वेध लागले आहे ते बाप्पाला निरोप देण्याचे.विसर्जनासाठी शहरातील सर्वच मंडळाच्या गणेश मूर्ती या पाच कंदील परिसरात आणल्या जातात. तेथून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो. तसेच काही मंडळाच्या विसर्जन मिरवणुकांना शिवाजी पुतळ्यापासून सुरूवात होत असते.विसर्जन मिरवणुकांना कुठलाही अडथळा येवू नये, यासाठी रस्ते चांगले असणे, लोंबकळलेल्या तारा दूर करणे, तसेच पाण्याचे उघडे व्हॉल्व्ह बंद करणे गरजेचे आहे. नेमकी याच्या उलट परिस्थिती विसर्जन मिरवणूक मार्गावर दिसून आली.शिवाजी पुतळ्याजवळील रस्त्यावर लहान लहान खड्डे पडलेले आहेत. त्याच्या थोडे पुढे आल्यानंतर पाच कंदील भागातच जागोजागी खड्डे पडलेले दिसून आले. तेथून मात्र फुलवाला चौक पर्यंतचा रस्ता अतिशय चांगला आहे.मात्र गांधी पुतळ्याजवळच्या रस्त्याची पार दुर्दशा झालेली आहे. याठिकाणी जागोजागी खड्डे पडलेले दिसून आले. गांधी पुतळा परिसरात शेकडो नागरिक विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी येत असतात. परंतु याच भागात पाण्याचे दोन व्हॉल्व्ह उघडे असल्याचे दिसून आले. रात्रीच्यावेळी तसेच गर्दीत या उघड्या व्हॉल्व्हकडे कोणी बघत नाही. त्यात अनावधनाने कोणाचा पाय पडल्यास, अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेने या व्हॉल्व्हवर तात्पुरते झाकण ठेवण्याची आवश्यकता आहे.मुख्य विसर्जन मिरवणुक वगळता काही मंडळे आपल्या सोयीनुसार विसर्जन मिरवणुका काढतात. फाशी पुलाकडील काही गणेश मंडळे शिवतीर्थ मार्गे मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. तर काहीजण गणपती पुलामार्गे जात असतात. मात्र फाशी पुलाकडून येणाऱ्या मिरवणुकांनाही खड्डयांचा अडथळा आहे. शिवतीर्थजवळच मोठा खड्डा पडलेला आहे.महापालिकेने डागडुजी करावीविसर्जन मिरवणूक निघण्यास अजून एक दिवसाचा कालावधी आहे. तत्पूर्वीच महानगरपालिकेने विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील रस्त्याची दुरूस्ती करावी.त्याचबरोबर वीज वितरण कंपनीने लोंबकळलेल्या तारा ओढाव्यात अशी मागणी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे