शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे शिरपुर तालुक्यात ३३ पुतळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:36 IST

औचित्य जयंतीचे । विविध मार्ग व कॉम्प्लेक्सलाही डॉ़ बाबासाहेबांचे नाव

सुनील साळुंखे ।शिरपूर : शहरातील डॉ़ शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळ्यासह तालुक्यात एकूण ३३ पुतळे आहेत़डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती पारंपारीक पध्दतीने साजरी केली जात आहे़ शहरात डॉ़ शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात व मार्केट आवारात पूर्णाकृती पुतळा तर वरचे गावातील बौध्दवाड्यात डॉ़ बाबासाहेबांचा पुतळा आहे़ याशिवाय शिरपूर पोलिस ठाणे हद्दीत १७, थाळनेर पोलिस ठाणे हद्दीत ५ तर सांगवी पोलिस ठाणे हद्दीत ८ असे एकूण ३० पुतळे उभारण्यात आली आहेत़शहरात विविध संस्था व मार्गांना डॉ.बाबासाहेबांचे नावे देण्यात आले आहेत़ त्यात बोराडीसह जातोडे येथील विद्यालयांचा समावेश आहे़ तर शिरपूर शहरातील नाट्यगृहे आणि विविध रस्ते यांना देखील डॉ़ बाबासाहेब यांचे नाव देण्यत आले आहेत़ दिलीप टी हाउस ते आंबेडकर चौक वरचे गावपर्यंतचा मार्ग तसेच इंदिरा मेमोरिअल हॉस्पिटलच्या खालच्या भागास भीमनगर, नगरपालिकेच्या शेजारील शॉपिंग कॉम्प्लेक्सला डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग कॉमप्लेक्स, वरच्या गावातील बौध्द वस्तीलाही नाव दिलेले आहेत़ जनजागृती करण्यासाठी जागर मंच शहरात कार्यरत आहे़ त्यांचे विचार व कार्यावर आधारलेले प्रबोधनपर, जागृतीपर आणि क्रांतिकारी गीते एखादा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी उपस्थितांना जागेवर बसवून ठेवण्यासाठी हा मंच काम करतो. क्रांतीनगरात त्रिरत्न बुद्धविहार, खालचे गाव बौध्दवाडा येथील समाज मंदिरास समाज भवन, कोर्टासमोरील फुले, शाहू, आंबेडकर सामाजिक सभागृह बांधून दिले आहे़सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. सी. एच. निकुंभे यांनी ग्रंथ संपदा प्रकाशित केली आहे़ त्यात डॉ. बाबासाहेबांनी बहिष्कृत समाजाला मानवी प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, यासाठी आयुष्यभर आपले लिखाण आणि भाषणातून प्रबोधन केले़ त्या प्रबोधन कार्याचा आढावा घेणारा ग्रंथ ‘समाज प्रबोधनकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ या पुस्तकातून प्रकाशित केला आहे़राष्ट्रीय कार्य आणि त्यांच्या राष्ट्रावादाविषयी व्यक्ती द्वेषाने पछाडलेले तथाकथित विद्वान शंका उपस्थित करतात़ त्यासंबंधी समर्पक उत्तरादाखल वास्तव मांडणी करणारा ग्रंथ ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद आणि विपर्यास’, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्याग्रहासंदर्भात ब्रिटीश सरकारच्या गोपनीय अहवालाद्वारे सरकारचा चळवळीकडे पाहण्याची भूमिका विषद करणारा ग्रंथ ‘आंबेडकरांचे सत्याग्रह आणि ब्रिटीश सरकार’, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय तत्वज्ञान, त्यांचे सक्रीय राजकारण त्यांच्यानंतर रिपब्लिकन राजकारण्याची अवस्था, शासनकर्ते होण्याचे स्वप्न यावर आधारलेला ग्रंथ ‘दलितांनी शासनकर्ते व्हावे’, अनुयायांनी शासनकर्ते व्हावे, जातीसंस्थेचे उच्चाटन करावे, भारत बौद्धमय करावा आदी अनेक प्रसंगी व्यक्त केलेल्या अपेक्षावर आधारलेला ग्रंथ ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अनुयायांकडून अपेक्षा’ या पुस्तकात प्रकाशित केल्या आहेत़दरम्यान, रविवारी शिरपूर शहरात विविध शाळा-महाविद्यालय, चौका-चौकात जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात येणार असल्याने कार्यकर्त्यांचे नियोजन सुरु होते़

टॅग्स :Dhuleधुळे