शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात सातबारा दुरुस्तीला सर्व्हरचा डाऊनचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 21:31 IST

जिल्ह्यातील ६७८ पैकी ११६ गावातील सातबारे अद्ययावत : ५६२ गावातील सातबारा दुरुस्तीचे काम सुरू

ठळक मुद्देमहसूल विभागातील महत्त्वाचा घटक असलेल्या तलाठ्यांना कामाच्या ठिकाणी व सातबारा अद्ययावत करण्यास अनेक अडचणी येत होत्या.त्यामुळे दैनंदिन कामासाठी लॅपटॉप मिळावे? अशी मागणी होत होती. त्यानुसार जिल्ह्यासाठी १४१ लॅपटॉप पहिल्या टप्प्यात प्राप्त झाले असून लॅपटॉपसोबत नेटसेटरदेखील उपलब्ध करून दिले जाणार आहे.तलाठ्यांना लॅपटॉप वितरित केल्यानंतर त्यांच्या कामात गती येणार असून सातबारा अद्ययावत करण्याचे कामही पूर्ण होण्यास मदत होणार आहे.मात्र, लॅपटॉप प्राप्त झाले असले, तरीही अद्याप एकाही तलाठ्यांना ते मिळालेले नसल्याची परिस्थिती समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आॅनलाइन सातबाºयांमध्ये त्रुटी  आढळून आल्यानंतर  शासनाने सातबा-यांमधील त्रुटींची दुरुस्ती (रि एडिट मॉड्यूल) करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, सातबारा दुरुस्तीसाठी देण्यात आलेल्या सॉफ्टवेअरचे सर्व्हर वारंवार डाऊन येत असल्याने गेल्या दोन महिन्यात ६७८ गावांपैकी केवळ ११६ गावांचे सातबारे अद्ययावत झाले असून ५६२ गावातील सातबारा दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वसामान्यांना प्रशासकीय कार्यालयाचे उंबरठे वारंवार झिजवावे लागू नयेत, यासाठी शासनाने आॅनलाइन सातबारा तयार करावा, अशा सूचना प्रशासनाला दिल्या होत्या.  त्यानुसार गेल्या वर्षभरापासून तलाठ्यांनी दिवस-रात्र एक करत आॅनलाइन सातबारे तयार केले.  परंतु, गावपातळीवर झालेल्या चावडी वाचनात सातबाºयांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे शासनाने त्रुटी आढळून आलेल्या सातबाºयांची दुरुस्ती रि एडिट मॉड्यूल सॉफ्टवेअरद्वारे करावी, असे प्रशासनाला सूचित केले. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील ६७८ गावांपैकी ११६ गावांतील सातबारे अद्ययावत झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. संकेतस्थळाचे सर्व्हर दिवसभर डाऊनसातबा-यातील चुका दुरुस्तीसाठी असलेले रि एडिट मॉड्यूल संकेतस्थळावर  राज्यभरात एकाचवेळी हे काम सुरू असल्यामुळे हे संकेतस्थळ अतिशय धिम्या गतीने सुरू असल्याचे सांगितले जाते. सायंकाळी सहा वाजेनंतरच हे संकेतस्थळ व्यवस्थित चालते. त्यामुळे तलाठी व कर्मचाºयांना रात्री उशिरापर्यंत त्यांच्या कार्यालयात थांबून रहावे लागत आहे.  सर्व्हर डाऊनमुळे जिल्ह्यातील तलाठी व मंडळाधिकारी हैराण झाले आहेत. वेंडिंग मशीनची प्रतीक्षा कायमआॅगस्ट महिन्यात आॅनलाइन सातबारा सॉफ्ट कॉफीचा शुभारंभ झाला. तेव्हा एटीएम मशीनमधून जसे पैसे मिळतात; त्याप्रमाणे वेंडिंग मशीनद्वारे सातबारा नागरिकांना मिळेल, असे सांगितले होते. परंतु, प्रशासकीय पातळीवर तूर्त तरी वेंडिंग मशीन आणण्याबाबत हालचाली दिसत नाहीत. सातबारा दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर हे मशीन येऊ शकते, असे सांगितले जात आहे.