शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील मलनिस्सारण प्रकल्प योजना ‘मजीप्रा’कडे हस्तांतरीत करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 11:58 IST

महापौर कल्पना महाले यांचे प्रधान सचिवांना पत्र 

ठळक मुद्देतांत्रिक मनुष्यबळाचा अभाव कारण अयोग्यसर्वपक्षीय नगरसेवकांनी केला होता महासभेत विरोधहस्तांतरण न  करण्याबाबत फेर निर्णय घ्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : अमृत अभियानांतर्गत शहरासाठी राबविण्यात येणारी मलनिस्सारण योजना महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडे पूर्ण ठेव तत्वावर हस्तांतरीत करू नये अशी मागणी  महापौर कल्पना महाले यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना पाठविलेल्या पत्राद्वारे  केली आहे. त्यामुळे या योजनेबाबत काय निर्णय होतो, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.महापौर महाले यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २५ सप्टेंबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत धुळे शहराच्या मलनिस्सारण प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार धुळे महानगरपालिका ही कार्यान्वयीन यंत्रणा निश्चित करण्यात आली होती.मात्र या योजनेच्या कामासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक मनुष्यबळाचा महापालिकेकडे अभाव आहे. सदर प्रकल्पाचे काम विहित कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही यासह विविध कारणास्तव  या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने महाराष्टÑ जीवन प्राधिकरणामार्फत पूर्ण ठेव तत्वावर राबविण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे कळविण्यात आले आहे.  तसेच महाराष्टÑ जीवन प्राधिकरणास सदर  योजना एक आठवड्यात ताब्यात घेण्याची व निविदा प्रक्रियेबाबतची पुढील कार्यवाही तत्काळ करण्यासाठी निर्देशित करण्यात आलेली आहे. दरम्यान हा प्रस्ताव निर्णयासाठी महासभेपुढे सादर करण्यात आला असता, त्यास सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र विरोध केलेला आहे. त्यामुळे ही योजना महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडे कार्यान्वयासाठी हस्तांतरणास महापालिकेच्या तीव्र विरोधाची शासनाने दखल घ्यावी. हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे आमचे मत आहे. केवळ धुळे महानगरपालिकेस शासनाने दिलेली सापत्न वागणूक ही राज्यघटनेची पायमल्ली ठरत आहे. त्यामुळे ही योजना ‘मजीप्रा’कडे हस्तांतरीत न करण्याबाबतचा फेर निर्णय घेण्यात यावा असेही निवेदनात म्हटले आहे. अमृत योजनेंतर्गत राज्यात ४३ शहरात पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजना राबविली जात आहे. या सर्व प्रकल्पांसाठी कार्यान्वय यंत्रणा म्हणून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आहे. पीएमसी महाराष्टÑ जीवन प्राधिकरण आहे. या ४३ पैकी बहुतांशी नगरपरिषदा, असून त्यांच्याकडे अत्यंत कमी प्रमाणात तांत्रिक मनुष्यबळ आहे. धुळे मनपाकडे तांत्रिक मनुष्यबळ असतांना अपुºया मनुष्यबळाचे कारण देऊन, केवळ धुळे  शहराची योजना कार्यान्वयासाठी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडे देण्याचा  निर्णय शासनाने घेतल्याने, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकारावर गदा आलेली आलेली आहे, असे पत्रात नमूद केले आहे. दरम्यान महापौरांनी पाठविलेल्या पत्रानंतर संबंधित विभाग काय निर्णय घेतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.