साकळी, ता.यावल : प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचार्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून वेतन थकल्याने ऐन सणासुदीत त्यांची ताणाताण होत आहे.
पगाराअभावी कर्मचार्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.एकूण १५ कर्मचार्यांना ऑगस्ट महिन्यापासून पगार मिळालेला नाही. कामे रखडल्याने डीएचओंना कनिष्ठ सहायक मिळणेबाबत पत्र देण्यात आल्याचेही कर्मचार्यांनी स्पष्ट केले आहे.संबंधितांनी याकडे लक्ष देऊन साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचार्यांचा पगाराचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा व या प्राथमिक आरोग्य केंद्रात लिपिक देण्याची मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)
■ ऑगस्ट २0१४ पासून कर्मचार्यांचे पगार प्रलंबित आहे.कनिष्ठ सहायक डेप्युटेशनवर जळगाव येथे असल्यामुळे ते पगार काढण्याकरिता येत नाही. याबाबत यावल पं.स.चे गटविकास अधिकारी यांना सूचना देऊनही काहीएक उपयोग झाला नसल्याचे कर्मचार्यांनी पत्रकात म्हटले आहे. आरोग्य सभापती हर्षल पाटील यांना निवेदन देण्यात आले. आश्वासन मिळूनही प्रश्न मार्गी लागलेला नाही. ऑगस्ट महिन्यापासून पगार नाही.