शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीचे क्षेत्र वाढूनही जिल्ह्याचा खतांचा साठा घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 15:31 IST

गेल्यावर्षाच्या तुलनेत  ५ हजार मेट्रीक टन साठा कमी मिळाला

ठळक मुद्देकृषी आयुक्तालयाकडे १ लाख २२ हजार ९८० मे.टन खतांची मागणीत्यापैकी ६८ हजार ७०० मे.टन खत मंजूरबियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध

आॅनलाईन लोकमत धुळे : यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. रब्बीसाठी कृषी विभागाकडून खतांचे नियोजन करण्यात आले असून, मागणी पैकी ६८ हजार ७०० मेट्रीक टन खते मंजूर झाली आहेत. गेल्यावर्षी ७३ हजार ७६० मेट्रीक टन खतांचा पुरवठा झाला होता. त्यातुलनेत यावर्षी ५ हजार ६० मेट्रीक टन खतांचा साठा कमी झाला आहे. दरम्यान शेतकºयांना खतांची कमी पडू दिली जाणार नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.यावर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला समाधानकारक पाऊस झाला नाही. मात्र आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबरच्या सुरवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने, शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. समाधानकारक पावसामुळे यावर्षी जिल्हयात  १ लाख २३ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी प्रस्तावित आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी रब्बीच्या पेरणीत १० ते १५ टक्यांनी वाढ झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.रब्बीसाठी कृषी विभागाने खतांचे नियोजन केले आहे. त्यानुसार  कृषी आयुक्तालय, पुणे यांच्याकडे १ लाख २२ हजार ९८० मेट्रीक टन खतांची मागणी केली होती. त्यापैकी  जिल्ह्यासाठी ६८ हजार ७०० मेट्रीक टन खते मंजूर झालेली आहेत.  यात युरिया २९ हजार ७०० मे.टन, डीएपी-४९००, पोटॅश-४ हजार, सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी)- १३ हजार २००, तर एनपीके १६ हजार ९०० मेट्रीक टनाचा समावेश आहे.पाच हजार टन साठा घटला गेल्यावर्षी रब्बीचे क्षेत्र कमी होते.असे असतांनाही ७३ हजार ७६० मेट्रीक टन खताचा साठा उपलब्ध झालेला होता. यावेळी रब्बीचे क्षेत्र वाढूनही, गेल्यावर्षापेक्षा पाच हजार ६० मेट्रीक टन साठा घटल्याचे कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे.६८ हजार ६२२ क्विंटल बियाण्यांची मागणीरब्बीसाठी ६८ हजार ६२२ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आलेली आहे. यात महाबीजकडून ४७ हजार ९३७ क्विंटल, तर खाजगी कंपन्यांकडून २० हजार ६८५ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आलेली आहे.बियाणे उपलब्धमहाबीजकडून  बियाणे उपलब्ध झालेली आहेत. यात गहू- १३हजार १४० क्विंटल, हरभरा- २७७० क्विंटल, भूईमुग-२२५० क्विंटल, सुधारित रब्बी ज्वारी-७३५ तर सूर्यफुलाचे -१० क्विंटल बियाणे उबलब्ध आहे.खते कमी पडू देणार नाही : बैसाणेरब्बीसाठी खतांचे नियोजन करण्यात आलेले आहे. शेतकºयांना खतांची अडचण भासू देणार नाही. मागणीनुसार पुरवठा होत असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी भालचंद्र बैसाणे यांनी सांगितले.