मार्च व एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधित होतो. त्यामुळे या काळात म्युकरमायकोसिस आजाराने जिल्ह्यात डोके वर काढले होते. त्यामुळे पहिल्या टप्यात २५० रुग्ण आढळले होते. त्यापैकी ४ रुग्णांचा मृत्यू झाला होतो. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाची लाट ओसरल्याने कोरोना बाधित रुग्ण व म्युकरमायकोसिसचे रुग्ण घटले आहे. सद्यस्थितीत २१ रुग्ण या आजारावर उपचार घेत असून त्यांना लवकरच डिचार्ज दिला जाणार आहे.
विभागात सर्वात कमी रुग्ण
नाशिक, अहमदनगर, नंदूरबार तसेच जळगाव अशा चारही तालुक्यात म्युकरमायकाेसिस या आजाराचे रुग्ण सर्वाधित आढळून आले आहे. त्या तुलनेत धुळ्यात केवळ २१ रुग्ण सद्यस्थितीत उपचार घेत आहेत. त्यामुळे नाशिक विभागात रिकव्हरी रेटमध्ये धुळे जिल्हा
अव्वल स्थानी आहे.
कोरोना दुसरी लाट आटोक्यात आल्यापासून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. कोरोना काळात २५० पेक्षा अधिक रुग्ण जिल्ह्यात आढळून आले होते. त्यापैकी ४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. सध्या २१ रुग्ण उपचार घेत असून त्यांनादेखील लवकरच डिचार्ज दिला जाणार आहे.
डाॅ. नितीन पाटील, जिल्हा नोडल अधिकारी, म्युकरमायकोसिस