शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

समितीकडून जिल्ह्याची दुष्काळाची पाहणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:34 IST

शेतीची पाहणी करीत शेतक-यांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : केंद्र सरकारचे दुष्काळ पाहणी पथक आज धुळे जिल्ह्याच्या दौैºयावर होते. या पथकातील सदस्यांनी धुळे तालुक्यातील दुष्काळग्रस्त वणी व लळिंग शिवारातील शेतीची पाहणी करीत तेथील शेतकºयांशी संवाद साधला.केंद्र सरकारचे दुष्काळ पाहणी पथक राज्याच्या दौºयावर आहे. या पथकाने आज सकाळी जळगाव जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर या तालुक्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी केली. त्यानंतर या पथकाचे धुळे जिल्ह्यात आगमन झाले. या केंद्रीय पथकात कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या सहसचिव छावी झा, कडधान्य विकास संचालनालयाचे संचालक ए. के. तिवारी, केंद्रीय कृषी विभागाच्या शालिनी सक्सेना,  केंद्रीय जलसमितीचे संचालक आर.डी. देशपांडे यांचा समावेश होता.यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, नाशिक विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा कृषी अधिकारी पी. एम. सोनवणे, तहसीलदार अमोल मोरे यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.या पथकातील सदस्या तथा कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या सहसचिव झा यांनी शेतकºयांशी संवाद साधला. शेतीत काय पेरा केला होता, किती पाऊस झाला, किती उत्पन्न आले, गेल्या वर्षी किती उत्पन्न आले होते. पीक पध्दती, आंतरपिके, पाणी वापराच्या पध्दती, पीक विमा, पीक कर्ज याविषयी सविस्तर माहिती घेत शेतकºयांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले, या भागात जलयुक्त शिवार अभियानाची विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. मात्र, या वर्षी पुरेशा पावसाअभावी पाण्याची तीव्रता जाणवत आहे, असे नमूद केले. वणी येथे राजेंद्र कटारिया यांच्या शेतात, तर लळिंग येथील अभिमन भिल यांच्या शेताची पाहणी या पथकाने केली. यावेळी लळिंगचे सरपंच झेंडू सोनवणे यांच्यासह लळिंग व अवधान परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे