शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यानंतर उघडणार जिल्हा परिषद अध्यक्ष,उपाध्यक्षांची दालने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 11:26 IST

प्रशासकाच्या नेमणुकीमुळे दालनांना लावले होते सील

आॅनलाइन लोकमतधुळे :जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्तीनंतर अध्यक्ष,उपाध्यक्षांसह सभापतींची दालने सील करण्यात आली होती. मात्र आता सहा महिन्यानंतर म्हणजे १७ जानेवारी रोजी अध्यक्ष,उपाध्यक्षांची दालने उघडणार असून, सभापतींच्या निवडीनंतर त्यांचीही दालने उघडण्यात येतील असे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले.जिल्हा परिषदेच्या सदस्यांची मुदत डिसेंबर २०१८ मध्ये संपली होती. मात्र आरक्षणाचा वाद न्यायालयात पोहचल्याने, निवडणूक लांबली. त्यामुळे तत्कालीन शासनाने तत्कालीन जिल्हा परिषद सदस्यांना मुदतवाढ दिली होती. दुसऱ्यांदा मुदतवाढ न देता शासनाने १८ जुलै २०१९ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासकाची नियुक्ती केली. त्यानंतर १९ जुलै रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विविध विषय समिती सभापतींच्या दालनाला सील करण्यात आले होते. तब्बल सहा महिन्यांपासून हे दालन बंद आहेत.दरम्यान नुकतीच जिल्हा परिषदेची निवडणूक आटोपली असून, ३९ जागा जिंकून भाजपने सत्ता मिळविली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष,उपाध्यक्षाची निवड येत्या १७ जानेवारी रोजी होणार आहे. निवडीनंतर लागलीच नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्षांना दालने देण्यात येतील. त्यामुळेच १७ रोजीच ही दालने उघडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.दालनांची स्वच्छतासहा महिने अध्यक्ष,उपाध्यक्षांची दालने बंद होती. त्यामुळे तेथे बरीच धुळ झाली होती. गुरूवारी अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या दालनांची स्वच्छता करण्यात आली.

टॅग्स :Dhuleधुळे