शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात ‘टीईटी’साठी प्रवेश न मिळालेल्या परीक्षार्थींची जिल्हाधिकाºयांच्या निवासस्थानी धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 12:34 IST

परीक्षार्थींनी आमदारांसमोर मांडली कैफियत, १५० विद्यार्थी परीक्षेपासून वंचीत

ठळक मुद्देधुळ्यात सकाळच्या सत्रात ९ केंद्रावर परीक्षा सुरूवेळेत न पोहचलेले जवळपास २०० विद्यार्थी परीक्षेपासून वंचीतपरीक्षार्थींनी घेतली आमदार गोटे यांची भेट

आॅलनालइ लोकमतधुळे : महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षेसाठी प्रवेश न मिळू शकलेल्या परीक्षार्थींनी आज सकाळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या निवासस्थानी धडक दिली. मात्र जिल्हाधिकाºयांच्या निवासस्थानी  प्रवेश न मिळाल्याने परीक्षार्थींनी आमदार अनिल गोटे यांची भेट घेऊन आपली कैफीत मांडली. दरम्यान शहरात सर्वच केंद्रावर पहिला पेपर सुरळीत पार पडला.  धुळे शहरात सकाळच्या सत्रात  ९ केंद्रावर  टीईटीची परीक्षा होत असून, यासाठी  ३ हजार ६६४ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. पहिला पेपर सकाळी १०.३० ते १ यावेळेत होता. पहिल्या सत्रात दहा वाजेनंतर येणाºया परीक्षार्थींना प्रवेश दिला जाणार नाही अशी स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने अगोदरच दिलेली होती. असे असतांना काही परीक्षार्थी शहरातील कनोसा कॉन्व्हेंट, जयहिंद हायस्कूल, शिवाजी हायस्कूल या केंद्रावर सव्वा दहा पर्यंत पोहचले. वेळेत न आलेल्या परीक्षार्थींना  प्रवेश नाकारण्यात आला. असे असतांनाही काहींनी प्रवेशद्वारावर चढून आत प्रवेश केला. मात्र त्यांनाही बाहेर काढण्यात आले. वेळेत न पोहचू शकल्याने, जवळपास १०० ते १५० परीक्षार्थी पहिल्या पेपरपासून वंचीत राहिले. परीक्षेसाठी प्रवेश मिळावा म्हणून वंचीत राहिलेल्या परीक्षार्थींनी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या निवासस्थानी धडक दिली. मात्र या सर्व विद्यार्थ्यांंना जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानाबाहेरच अडविण्यात आले. त्यामुळे या परीक्षार्थींनी आपला मोर्चा आमदार अनिल गोटे यांच्याकडे वळविला. आमदार गुलमोहर विश्रामगृहात असल्याचे समजताच, सर्व परीक्षार्थी त्याठिकाणी पोहचले. त्यांनी आमदार गोटे यांच्यासमोर आपली कैफीयत मांडली. आमदारांनी शिक्षण संचालक रामचंद्र जाधव, जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. या परीक्षार्थींना शिक्षण विभागाला निवेदन देण्याचे सांगून शासनस्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर परीक्षार्थी माघारी परतले.  

टॅग्स :Dhuleधुळे