धुळे : दोंडाईचा येथे युवासेनेतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरात १५० नागरिकांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले. आरोग्य विभागाकडून तपासणी केल्या नागरिकांचा अहवाल प्राप्त झाल्याने त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.
या शिबिरात १५० नागरिकांनी रक्ताचे नमुने तपासणीसाठी दिले होते. त्यातील १०५ नागरिकांना मलटिव्हिटॅमिन, कॅल्शिअम, अँटिपयरिटी सी, सिरप सारखी औषधांची गरज होती. अशांना रुग्णालयामार्फत मोफत वाटप करण्यात आले. यासाठी दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद व रोटरी क्लबचे सहकार्य लाभले. डॉ. हर्षल सोनवणे, नीलेश जैन, सोनाली ईशी, रियाज मिरजा यांनी नागरिकांची तपासणी करून उपचार केले. याप्रसंगी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख शैलेश सोनार, युवासेनेचे तालुकाप्रमुख आकाश कोळी, शहरप्रमुख सागर पवार, निखिल जयसिंघानी, योगेश बोरसे, शिवसेनेचे उपशहरप्रमुख आबा चित्ते, चुडामण बोरसे, दीपक मराठे, विजय वाडीले, राज ढोले, लखन मराठे, सुरेश कोळी, सचिन कोळी, विशाल कोळी, बन्सी पुढारी, प्रकाश महाजन, सनी कोळी, भारत कोळी, किरण सावळे, जितू कोळी, संजय कोळी, गणेश विसावे, चतुर कोळी यांनी परिश्रम घेतले.