शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलपाडा विषय विखंडीत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 22:37 IST

महापालिका : जिल्हाधिकाऱ्यांना शिवसेनेचे निवेदन

धुळे : अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेची निविदा १५ टक्के जास्त दराने मंजूर केली आहे़ या निणर्याने मनपाचे आर्थिक नुकसान तर ठेकेदारांचे हित जोपासले जाणार असल्याने हा विषय मनपा अधिनियम ४५१ नुसार विखंडीत करावा, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेतर्फे जिल्हा प्रशासनाला दिले.महानगरपालिकेने अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेसाठी १२७ कोटी रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध केली होती. प्रशासाकीय सदर निविदा नियमाप्रमाणे देशातील प्रमुख वृत्तपत्रात प्रसिद्ध न करता वैयक्तिक आर.एम. घुले या ठेकेदाराला फायदा मिळवून देण्यासाठी प्रशासनातील काहींनी हितसंबंध जोपासले. १२७ कोटी रुपयांच्या पाणी योजनेत जवळपास ८० कोटी खर्चून सुद्धा मागील चार वर्षात धुळेकरांना पाणी मिळालेले नाही.उच्च न्यायालयात तक्रार केली, तक्रारीची दखल घेत राज्य शासनाने अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे यांना चौकशीसाठी नियुक्त केले होते. त्यांनी चौकशी करून ३० मार्च २०१६ रोजी अहवाल राज्य शासनाकडे पाठवून त्यात गैरप्रकार झाल्याचे नोंदवत संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश दिले असून सुद्धा अहवाल दडपून ठेवण्यात आले आहेत. मागील महासभेत ठेकेदाराविरुद्ध ठराव करण्यात आले आहे़ प्रशासनाने चुकीची निविदा तयार करून मनपाने १२७ कोटींची योजना १३६ कोटींमध्ये मंजूर करून मनपा अधिनियम कायद्याचे उल्लंघन केले आहे.दरम्यान निविदा ४.९९ पेक्षा जास्त दराने मंजूर करता येत नाही हे माहिती असून ही आयुक्तांनी ठेकेदाराची बाजू उचलून त्याला लाभ मिळवून दिला आहे़ त्यामुळे १८ कोटींचा भुर्दंड मनपाला भोगावा लागत आहे, असे निवेदनात म्हटले आहे़ निवेदनावर संजय गुजराथी, सुनील राजपूत, धिरज पाटील, गुलाब माळी, प्रफुल्ल पाटील, राजेश पटवारी, संदीप चव्हाण, भरत मोरे, नरेंद्र परदेशी, अ.दि. सोनवणे, रविंद्र काकड, किशोर सपकाळे आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे