शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात रॅलीतून दिला व्यसनमुक्तीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 15:34 IST

उपक्रम : मनपा शाळा क्रमांक ९ च्या विद्यार्थ्यांनी केली जनजागृती

ठळक मुद्देरॅलीचा समारोप झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा व परिसरातील कचरा व इतरत्र पडलेल्या गुटख्याच्या पुड्या संकलित करून त्याची होळी केली. यशस्वीतेसाठी मनीषा गांगुर्डे, पिंजारी परवीन, नेहा जोशी, शारदा गायकवाड, वृषाली गायकवाड, पायल शहा यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी अक्षय पाटील यांनी विद्यार्थ्यांना ‘तंबाखू व त्यापासून होणारा गुटख्याचे दुष्परिणाम या विषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की व्यसनामुळे तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसन करू नये. तसेच आपला मित्र व्यसन करत असेल तर त्याला व्यसनांपासून होणाºया आजारांविषयी जागृत करून त्याचे प्रबोधन करावे, असा सल्ला त्यांनी येथे दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे :  शहरातील मनपा शाळा क्रमांक ९ च्या विद्यार्थ्यांनी सोमवारी रॅली काढत व्यसनांपासून दूर रहावे, असा संदेश दिला. यानिमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत गुटखा व कचरा संकलित करून त्याची होळी करण्यात आली.  प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाउंडेशन, नेहरू युवा मंडळ, म्हसाळे, छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्था, बिलाडी यांच्या संयुक्त विद्यमाने  ही रॅली काढण्यात आली. रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी यावेळी हिंदू एकता आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष हिरामण गवळी, मुख्याध्यापिका  इंदिरा भोसले, उज्ज्वल बोरसे, पवन शंखपाळ, जिल्हा समन्वयक पंकज शिंदे, राजेंद्र माळी उपस्थित होते. घोषणांद्वारे केली जनजागृती मनपा शाळा क्रमांक ९ येथून रॅलीला सुरुवात झाली.  पुढे ही रॅली गल्ली क्रमांक ५, भांडे गल्ली, पारोळा रोड, पवनपुत्र विजय व्यायामशाळा मार्गे मनपा शाळा क्रमांक ९ येथे आली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘गुटखा खाऊ नका’, ‘व्यसनांपासून दूर रहा’ यांसारख्या घोषणा देत येथील परिसर दुमदुमून सोडला.