शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जागेच्या वादात शौचालय रखडल्याने महिलांची कुचंबणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 22:29 IST

पांझरा नदीकाठचा परिसर : जागेचा शोध सुरु-आयुक्त, जागा दिल्यास शौचालय बांधून देणार-कार्यकारी अभियंता

धुळे : देवपुरातील साईबाबा नगर, गवळीवाडा परिसरात सार्वजनिक शौचालय तोडल्यानंतर वर्ष उलटूनही बांधकाम करण्यात आलेले नाही़ परिणामी सर्वसामान्य महिलांची कुचंबणा होत असल्याचे अधोरेखित होत आहे़ जागेचा वाद यानिमित्ताने समोर आला असून जागा देण्यासाठी गवळी समाजाकडून पुढाकार घेतला जाणार असल्याचे समोर येत आहे़देवपुरातील नकाणे रोडवर साईबाबा नगर, गवळीवाडा परिसर आहे़ ही वस्ती सर्वसामान्य नागरीकांची असल्यामुळे नगरसेवक भगवान गवळी यांनी २०११ मध्ये २० लाखांच्या निधीतून सार्वजनिक शौचालयाची उभारणी केली होती़ त्याचा लाभ या भागातील नागरीकांकडून घेतला जात होता़ अशातच वर्षभरापुर्वी पांझरा नदीपात्राच्या दोन्ही बाजुला प्रत्येकी साडेपाच किमी अंतराच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने कामाला सुरुवात झाल्यानंतर रस्त्याच्या मधोमध येणारे सार्वजनिक शौचालय महापालिकेची परवानगी न घेता तोडण्यात आल्याचा आरोप नगरसेवक भगवान गवळी यांनी केला़ हे शौचालय तोडून वर्ष उलटूनही नव्याने शौचालय उभारण्यात आलेले नाही़ परिणामी महिलांचे हाल होत असल्यामुळे पांझरा नदी पात्रातच हिरवे कापड लावून तात्पुरत्या स्वरुपात शौचालयाची उभारणी करण्याची नामुष्की ओढवली आहे़दरम्यान, पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे याच भागातील अनेकांच्या घरांचे नुकसान झाले़ पंचनामा केला़ आर्थिक मदत देऊ असे सांगण्यात आले़ पण, अजून मदत मिळाली नसल्साची कैफियत मांडण्यात आली़नागरीकांसाठी फिरते शौचालय देणारसाईबाबा नगर परिसरात सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले़ नंतर पाडण्यात आले आहे़ परिणामी नागरीकांची गैरसोय होत असल्यामुळे फिरते शौचालय देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे़ आयुक्त अजिज शेख यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद देखील मिळत आहे़ लवकरच फिरते शौचालय या भागासाठी देण्यात येणार आहे़सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम रस्त्यावर करण्यात आल्यामुळे ते काढण्यात आले़ जागा उपलब्ध करुन दिल्यास सार्वजनिक शौचालय बांधून देण्यात येईल़- विनोद भदाणे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग़सार्वजनिक शौचालय पाडल्यानंतर पर्यायी जागेचा शोध सुरु आहे़ जागेसाठी नागरीकांचा विरोध असल्यामुळे काम थांबले आहे़ या भागातील अतिक्रमण काढून सार्वजनिक शौचालय बांधण्यात येईल़- अजिज शेख, आयुक्त, महापालिका़सामान्य नागरीकांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले़ नंतर ते पाडण्यात आले आहे़ प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु असलातरी जागेचा मुद्दा पुढे आला आहे़ जागा देण्यासाठी गवळी समाजातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येऊन काही पर्यायी जागा देता येईल का यासाठी प्रयत्न केले जातील़- लक्ष्मण दहिहंडे, प्रदेशाध्यक्ष, गवळी समाज, धुळे़

टॅग्स :Dhuleधुळे