शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: जागा व तिकिट वाटपावरुन युतीतील इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 13:15 IST

राजेंद्र शर्मा।  लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :  जिल्ह्यातील जागा वाटपाचा तिढा सुटला असला तरी आता भाजप - शिवसेनेमध्ये  तिकिट ...

राजेंद्र शर्मा। लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  जिल्ह्यातील जागा वाटपाचा तिढा सुटला असला तरी आता भाजप - शिवसेनेमध्ये  तिकिट न मिळालेल्या इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर वाढला आहे. काही इच्छुक विचार विमर्शासाठी आपल्या समर्थकांच्या बैठकीसुद्धा घेत आहे. दरम्यान, धुळे ग्रामीण मतदारसंघात तिकिट मुलाने मागितले पण भाजपने त्यांच्या आईला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता ग्रामीण मतदारसंघात भाजपच्या ज्ञानज्योती भदाणे यांची लढत काँग्रेसचे विद्यमान आमदार कुणाल पाटील यांच्यात होईल, हे स्पष्ट झाले आहे.धुळे जिल्ह्यातील पाचपैकी धुळे ग्रामीण, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर विधानसभा मतदारसंघाच्या जागा भाजपकडे आहे. त्यात  शिंदखेडा येथून विद्यमान आमदार व मंत्री जयकुमार रावल आणि धुळे ग्रामीण मधून ज्ञानज्योती मनोहर भदाणे यांचे नाव निश्चित झाले आहे. साक्री आणि शिरपूर येथील उमेदवारांची नावे दुस:या यादीत जाहीर होणार आहे. तर सेनेच्या वाटयाला धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची जागा आली आहे. याठिकाणचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. जागा वाटपानंतर भाजप आणि शिवसेनेमधील इच्छूक उमेदवारांच्या नाराजीने डोके वर काढले आहे.दरम्यान, धुळे ग्रामीणची जागा भाजपला सुटल्याने शिवसेनेतर्फे या मतदारसंघात गेल्या पाच वर्षापासून सतत कार्यरत  व इच्छूक जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांचे तिकिट कापले गेल्याने ते नाराज आहेत. याशिवाय भाजपमधील इच्छूक भाजप किसान सेलचे रामकृष्ण खलाणे आणि माजी जि.प.सभापती प्रा.अरविंद जाधव हे सुद्धा नाराज झाले आहे. आता यांची नाराजी दूर करण्यासाठी भदाणे कुटुंबियांना मेहनत घ्यावी लागणार आहे.शिरपूर -   या जागेवर माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांचे कट्टर समर्थक व सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केलेले विद्यमान आमदार काशिराम पावरा यांची उमेदवारी जवळपास निश्चित समजली जात आहे. मात्र भाजपच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव नाही. कदाचित दुस:या यादीत ते येईल. परंतू त्यांच्या प्रवेशानंतर तालुक्यातील भाजपतर्फे इच्छूक उमेदवार डॉ.जितेंद्र ठाकूर यांच्या समर्थकांनी नाराजी  व्यक्त केली आहे. यासंदर्भात मंगळवारी सायंकाळी उशीरार्पयत  शिरपुरला त्यांच्या समर्थकांचा  मेळावा सुरु होता. मेळाव्याला भाजपचे तुषार रंधे, राहूल रंधे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित आहे. बैठकीत कार्यकत्र्याचे विचार ऐकल्यानंतर  पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर होईर्पयत ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेण्याचा निर्णय मेळाव्यात घेण्यात आला.साक्री - या जागेवर भाजपतर्फे कोणाला उमेदवारी मिळते, हा उत्सुकतेचा विषय आहे. कारण येथील काँग्रेसचे विद्यमान आमदार डी.एस. अहिरे यांनीे उमेदवारी नाकारल्याने भाजपमध्ये प्रवेश केला नाही. येथील काँग्रेसचे प्रमुख नेते माजी जि.प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते आणि त्यांचे चिरंजीव हर्षवर्धन दहिते हे लवकरच आमदार अमरिशभाई पटेल यांच्यासोबत भाजप प्रवेश करणार आहे. त्यामुळे मतदारसंघात भाजपचे वर्चस्व वाढणार आहे. शिंदखेडा - येथून भाजपतर्फे विद्यमान आमदार व राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्याविरोधात कोण उमेदवार उभा राहणार याबाबतच काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत सुरु असलेला घोळ अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचार कोणाचा करावा, अशा गोंधळात आहे. येथून राष्ट्रवादीतर्फे संदीप बेडसे, ज्ञानेश्वर भदाणे, सतीष पाटील तर काँग्रेसतर्फे शाम सनेर यांचे नाव आघाडीवर आहे.धुळे शहर- धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळाल्यामुळे येथून भाजपमधील इच्छूक उमेदवारांची घोरनिराशा झाली आहे. भाजपकडून येथून महानगर जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल, डॉ.माधुरी बाफना, रवी बेलपाठक आणि हर्षल विभांडीक यांची नावे चर्चेत होती.  सेनेतर्फे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांचे नाव गेल्या काही दिवसापासून आघाडीवर होते. त्यांच्यानंतर माजी महानगर प्रमुख सतीश महाले, डॉ.सुशिल महाजन, युवा सेनेचे पंकज गोरे यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र या सर्व चर्चाना मंगळवारी सायंकाळी पूर्णविराम मिळाला असून सेनेतर्फे शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांना एबी फॉर्म मिळाला   आहे.