धुळे : शहरात प्रत्येक प्रमुख चौक व परिसरात वीज तारांचे धोकादायक जाळे पसरत चालले आहे़ त्यामुळे वीज तारांचा धोका रोखण्यासाठी त्या भूमिगत करण्याची गरज आह़े़ मात्र महावितरणाकडून चालढकल होत असल्याने अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे़तीन वर्षांपूर्वी भूमिगत तारांसाठी शहरातील जीर्ण वीज तारांच्या सर्वेक्षण करण्यात आले होते़ शहरात काही भागात फायबर वील केबल टाकण्यात आली आहे़ तर बहूसंख्य भागातील उद्याप हा प्रश्न मार्गी लागलेला नाही़ वीज तारा, खांब यामुळे अनेक अपघात झाले आहेत़ अपघाताच्या घटना रोखण्यासाठी जीर्ण वीज तारा बदलणे, रस्त्यातील धोकादायक विद्युत खांब हटविणे, प्रमुख चौकातील वीज तारांचे जाळे भूमिगत करणे ही कामे तातडीने करणे गरज असतांना सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे़सर्वेक्षणाची गरजशहरातील धोकादायक वीजतारा, उघड्या डीपी, बंद पथदिवे यांचे सर्वेक्षण करून नवीन साहित्य व सुरक्षित ठिकाणी निर्माण करणे आवश्यक आहे़ शहरातील अरूंद गल्ल्यांमध्ये असलेल्या वीजतारा व खांबांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो़ भविष्यात अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच प्रशासनाने धोकेदायक विद्यृत खांब, डिपीचे ठिकाणे सुरक्षित करण्याची गरज आहे़
विद्युत खांबासह डिपीला काटेरी कुंपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 11:40 IST