शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

बाल वारकºयांनी काढली दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 12:09 IST

विठ्ठलनामाचा गजर : मुलांच्या पारंपारिक वेशभूषेचे आकर्षण

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शहरासह तालुक्यातील विविध शाळांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले़ आर.सी. पटेलशहरातील गुरूदत्त कॉलनीतील आर.सी. पटेल प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली. त्यात झाडे लावा, झाडे जगवाचे संदेश देण्यात आला़ शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रूक्मिनीची वेशभूषा केलेली होती. यावेळी मुख्याध्यापक आर.टी.भोई, छाया वाडीले, भारती मराठे,  एस.के.भील, शिरसाठ, शितल पाटील, हर्षदा भावसार, क्रीष्णा पावरा, प्रविण पाटील उपस्थित होते़हिरा नगरयेथील हिरा नगरातील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने  दिंडी काढण्यात आली. वारकरी संप्रदयाची परंपरेला जोपासून  टाळ-मृदंगाचा गजर करून सकाळी दिंडीला सुरुवात झाली. परिसरातील भाविकांनी दिंडीच्या माध्यमाने विठ्ठल- रूखमाईचं दर्शन घेतले. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक छगनराव  सोनवणे, प्रभारी मुख्याध्यापक हंसराज पाटील यांच्या हस्ते दिंडीची सुरुवात झाली. यावेळी  ज्वाला मोरे, दीपिका पाटील, कविता सोनवणे आदी उपस्थित होते़एच.आर. पटेलयेथील एच.आर.पटेल कन्या प्राथमिक विद्यालयात आषाढी दिंडी पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला़ आषाढी एकादशी निमित्ताने विद्यालयातून विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा काढण्यात आला. विद्यार्थीनींनी संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, जनाबाई, नामदेव, तुकाराम, एकनाथ  यांच्या  रूपात  हजर होत्या.  इयत्ता बालवाडीच्या विद्यार्थींनींनी विठ्ठल व रखुमाई या वेषात उपस्थित होत्या. मुख्याध्यापक गणेश साळुंके यांनी ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचे व ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करून दिंडीचा शुभारंभ केला. आर.सी. पटेल मराठी शाळायेथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीनिमित्त वृक्ष दिंडी व ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय वरसाळे, माजी नगरसेवक दिलीप बोरसे, शालेय परिवहन समिती सदस्य दत्तू माळी, मुख्याध्यापक सी.डी. पाटील आदी उपस्थित होते. शुभांगी बाविस्कर यांनी आषाढी एकादशी बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संदीप चौधरी, गजेंद्र जाधव, जगदीश धनगर, गोपाल न्हावी यांनी चौथी वर्गातील विद्यार्थ्यांचा वृक्षमित्र ग्रृप तयार करून जागा तुमची रोपटे आमचे या अभिनव उपक्रमाला सुरुवात केली. आदर्शनगर, सुभाष  कॉलनीतील नागरिकांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले व वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घरमालकाला देण्यात आली.बोराडीयेथील कर्मवीर इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने गावात वृक्षदिंडी काढून झाडे लावा झाडे जगवा, वृक्षांचे संवर्धन व संगोपन करा अशा घोषणा देत वृक्ष लागवड संदर्भात जनजागृती केली. यावेळी  कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य जिजाबराव निकम, संजय पाटील, अर्जुन पवार, स्कुलचे समन्वयक जी.ओ.पाटील, प्राचार्या पल्लवी पवार, प्राथमिकच्या प्राचार्या सविता वाल्हे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे