शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दर घटल्याने शेतक-यांची अडचण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 16:41 IST

जेमतेम आवक : सहा महिने साठवूनही अपेक्षित दर मिळेना, सरकारच्या हस्तक्षेपाची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे/पिंपळनेर :  दरात घट झाल्याने धुळे व पिंपळनेर येथील बाजार समित्यांमध्ये कांद्याची पूर्वीच्या तुलनेत आवक जेमतेम होत आहे. सहा महिने चाळींमध्ये कांदा साठवूनही अपेक्षित भाव मिळत नसून कांदा सडू लागल्याने शेतकºयांना तो विक्री केल्याशिवाय गत्यंतर नाही, अशी परिस्थिती आहे. अशा स्थितीत सरकारने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी अपेक्षा कांदा उत्पादकांमध्ये व्यक्त होत आहे. धुळे बाजार समितीत सध्या कांद्याच्या आवकमध्ये चढउतार होत आहे. कधी १४५० क्विंटल तर कधी साडेसहा हजार क्विंटल अशी      गेल्या आठवड्यात आवक झाली. तर पिंपळनेर उपबाजार समितीत सध्या रोज ३० ते ४० वाहन कांद्याची आवक   होत आहे. मात्र मिळणाºया दरातून शेतकºयांचा कुठलाही खर्च निघत नसून तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला त्यांना सामोरे जावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.  सरकारने अशा परिस्थितीत शेतकºयांना मदतीची भूमिका घ्यावी, अशी मागणीही होत आहे. जुन्या कांद्याला अत्यल्प भाव असून नवीन कांद्याला ६०० ते ८००  रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे.  मात्र त्यात कोणताही खर्च निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटामुळे भरडला जात आहे. चाळींमधून कांदा बाहेर कांदा सहा महिने चाळीमध्ये साठवूनही शेतकºयांना कुठलाही प्रकारचा जास्तीचा भाव मिळालेला नाही. उलट आहे त्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे आजही बहुतांश चाळींमध्ये कांदा दिसत असून त्यात मोठ्या प्रमाणात सड आहे. नवा कांदा बाजारात येऊ लागल्याने जुन्या कांद्याचे भाव गडगडले.तसेच नव्या कांद्यालाही भाव नसल्याने एकंदरीत कांदा उत्पादक शेतकºयांंमध्ये सरकारप्रती नाराजी आहे. कांदा निर्यात सुरू करावी तसेच असलेल्या कांद्याला भाव मिळावा यासाठी शेतकरी हा सरकार काही निर्णय घेईल, याची प्रतीक्षा होत आहे, सध्या उन्हाळी कांद्याची लागवड सुरू असल्याने भविष्यात या कांद्याला भाव मिळेल किंवा नाही, अशी शंका  आहे. मात्र तरी शेतकºयांनी यंदाही कांदा लागवडीचे सूत्र हाती घेतले आहे. पण सरकारने येऊ घातलेल्या कांद्याला भाव द्यावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य शेतकºयांकडून वर्तविली जात आहे.  ग्रामीण भागात शेतकºयांच्या असंख्य समस्या असून त्या सोडविण्यासाठी  शेतमालाला भाव मिळेल, अशी मागणी आता शेतकºयांमधून होऊ लागली आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे