शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धुळे येथे दिव्यांगाच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 11:38 IST

पोलीस अधिकारी, जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली आंदोलनाची दखल

ठळक मुद्देविविध मागण्यांसाठी केले आंदोलनआंदोलनस्थळी अधिकाऱ्यांची भेटग्रामसेवकाने गुन्हा मागे घेण्याचे पत्र दिले

आॅनलाइन लोकमतधुळे : तालुक्यातील नवे कोठारे येथील दिव्यांग व्यक्तीस मारहाण करणाऱ्यांना अटक करावी, तसेच पुणे येथे दिव्यांगावर लाठी हल्याचा आदेश देणारे अधिकारी व हल्ला करणाऱ्या पोलिसांना निलंबित करावे यासह विविध मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आज क्युमाईन क्लबसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.संघटनेतर्फे जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, नवे कोठारे येथील दिलीप रामभाऊ दगडे या दिव्यांग व्यक्तीस बोरसुले (ता. धुळे) येथील ग्रामसभेत उपसरपंच सुनील दाजू गोयेकर यांनी मारहाण केली. यासंदर्भात उपसरपंचावर सोनगीर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर उपसरपंच गोयेकर हा दिलीप यास जीवे मारण्याची धमकी देतो. यासंदर्भात पोलिसांना निवेदने देण्यात आली. मात्र अद्यापही संबंधितावर कारवाई झालेली नाही. उपसरपंच गोयेकर व त्याच्या साथीदार व नातेवाईकांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली. तसेच ग्रामसेवक गोकूळ झालसे याने दिलीप दगडे याच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. त्यामुळे ग्रामसेवकाची चौकशी करून त्याला निलंबित करण्यात यावे.पुणे येथील अपंग कल्याण आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन करणाºया दिव्यांगावर अमानुषपणे लाठी हल्ला करण्यात आल. त्यात अनेक दिव्यांग जखमी झाले. लाठी हल्ला करण्याचा आदेश देणारे अधिकारी व लाठी हल्ला करणारे पोलीस यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे. तसेच लाठी हल्यात जखमी झालेल्या दिव्यांगाना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. वरील मागण्या पूर्ण झाल्यानाही तर आमरण ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.वसंत बोरसे, मंदाकिनी गायकवाड, अ‍ॅड.कविता पवार, प्रशांत जगताप, संजय सरग, दिलीप दगडे, भूषण अहिरे, संजय विभांडीक, संजय सोनवणे, संजय कांकरिया, मयूर खरात, चेतन देसले, राजेंद्र हालोरे, सतिलाल पदमोर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे