शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सलाईनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 11:26 IST

जिल्ह्यात वर्ग ३ ची २९९, तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह वर्ग -१ची चार पदे रिक्त

ठळक मुद्देजिल्ह्यात ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रवर्ग ३ ची २९९ पदे रिक्तवर्ग एकची ४ पदे रिक्त

धुळे : येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य स्त्री सहाय्यक, आरोग्यसेवकांसह वर्ग तीनची थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २९९ पदे रिक्त आहेत. एवढेच नाही तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह वर्ग एकची चार पदे रिक्त असून, या सर्व पदांचा पदभार प्रभारी अधिकाºयांकडे देण्यात आलेला आहे. रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी मागणी होऊ लागली आहे.ग्रामीण तसेच दुर्गम भागातील गरिब रूग्णांसाठी स्थानिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राचाच आधार असतो. त्याठिकाणीच त्यांच्यावर उपचार होत असतात. मात्र ग्रामीण भागात आरोग्याची सेवा देणाºयांचीच जिल्ह्यात कमतरता आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाºयांवरच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा कारभार सुरू आहे.जिल्ह्यातील चार तालुक्यांसाठी ४१ आरोग्य केंद्र असून, २३२ उपकेंद्र आहेत.जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व उपक्रेंद्रासाठी वर्ग तीनची एकूण ७८९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी फक्त ४९० पदे भरण्यात आलेली असून, तब्बल २९९ पदे रिक्त आहेत.जिल्ह्यात आरोग्य सहाय्यक (स्त्री)ची पदोन्नतीची एकूण ४१ पदे मंजूर असून, त्यापैकी २८ भरण्यात आलेली आहेत. तर १३ पद रिक्त आहेत. आरोग्य सेविकांची सर्वाधिक ३९५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २२१ भरण्यात आलेली असून, तब्बल १७४ पदे रिक्त आहेत.आरोग्य पर्यवेक्षकांची सात पदे मंजूर आहेत. यात सरळ सेवेचे दोन व पदोन्नतीची पाच असे एकूण सात पदे आहेत. त्यापैकी सहा पदे भरण्यात आलेली असून, एकच रिक्त आहे. आरोग्य सहाय्यकाची ५९ पैकी ५३ पदे भरण्यात आलेली असून, सहा रिक्त आहेत. तर आरोग्य सेवकांची (पुरूष, अनुसूचित क्षेत्रातील ७५ पदे नवीन बृहूत आराखड्यानुसार) २७७ पदे मंजूर असतांना १२८ पदे भरण्यात आलेली असून, ९९ पदे रिक्त आहेत. औषध निर्माण अधिकारीची ४२ पैकी ४० पदे भरण्यात आलेली असून, दोन पदे रिक्त आहेत. तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञची १८ पदे मंजूर असून, १४ भरण्यात आलेली असून, चार पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी शासनातर्फे आॅनलाइन जाहिरातही काढण्यात आलेली आहे. मात्र ही प्रक्रियाही थंड बस्त्यात आहे. आॅनलाइन प्रक्रिया असल्याने, किती अर्ज प्राप्त झाले या विषयी स्थानिकस्तरावर कुठलीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा पदभार प्रभारींकडे..आठ महिन्यांपूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा पदभार डॉ. सुधाकर मोरे यांनी स्वीकारला होता. मात्र त्यांची पुण्याला विनंती बदली झाली असून, गेल्या तीन आठवड्यांपासून या पदाचा पदभार डॉ. माणिक सांगळे यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात वर्ग एकची चार पदे आहेत. त्यात जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी यांचा समावेश आहे. ही सर्व पदे रिक्त असून, या पदाचा कारभार तूर्त प्रभारी अधिकाºयांकडेच सोपविण्यात आलेला आहे. तर वर्ग -२ चे प्रशासन अधिकारी पदही रिक्त असून, त्याचाही कारभार प्रभारींकडेच आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे