शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हा परिषदेत ५० कर्मचा-यांवर गंडांतराची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 12:08 IST

जि.प. : जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही; प्रशासनाने मागविली होती माहिती

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत मंजूर पदांच्या तुलनेत रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी कार्यरत कर्मचाºयांवर कामाचा ताण पडत आहे. त्यातच आता शासनाने जर अनुसूचित जमाती प्रवर्गातील कर्मचाºयांवर कारवाई केली तर मोठी अडचण होणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया कर्मचाºयांवर कारवाई झाली तर रिक्त जागांची संख्या आणखी वाढणार आहे. परिणामी कामाचा ताण कार्यरत कर्मचाºयांवर येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शासकीय सेवेत अनुसूचित जमाती प्रवर्गातून दाखल झालेले मात्र जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणारे कर्मचाºयांची सेवा समाप्तीचे आदेश न्यायालयाने नुकतेच दिले होते.  या आदेशानुसार जिल्हा परिषदेत किमान ५० कर्मचाºयांवर टांगती तलावार राहणार आहे.  या कर्मचाºयांबाबत काय करावे? यासंदर्भात अद्याप शासनाने भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी जिल्हा परिषदस्तरावर अशा कर्मचाºयांची माहिती मागविण्यात आली असून त्यात ५० कर्मचाºयांनी प्रमाणपत्र सादर केले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आदिवासी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांवर बिगर आदिवासींनी  नोकºया स्वीकारल्याचे आरोप होत असतात. यापूर्वी २०१३   मध्ये शासकीय सेवेत असलेल्या सर्वच कर्मचाºयांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश शासनाने दिले होते. या आदेशानुसार कर्मचाºयांनी  जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्तावदेखील दाखल केले आहेत. मात्र, हे प्रस्ताव अद्याप निकाली निघालेले नाहीत. दरम्यान, दुसरीकडे दोन महिन्यांपूर्वी न्यायालयाने अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया कर्मचाºयांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिलेले आहेत. जि.प.त १२२ कर्मचा-यांनीच सादर केले प्रमाणपत्र जिल्हा परिषदेत १९९५ ते २०१५ या कालावधीपर्यंत १ हजार १५९ अनुसूचित  जाती प्रवर्गाचे कर्मचारी सेवेत दाखल झाले आहेत. त्यापैकी आतापर्यंत एक हजार १२२ कर्मचाºयांनी ३१ आॅगस्ट २०१५ पर्यंत जातवैधता प्रमाणपत्र सादर केले आहेत. तर ५० कर्मचाºयांनी जातवैधता समितीकडे प्रस्ताव दाखल केलेले नाहीत. त्यांचे  प्रस्ताव जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रलंबित  आहेत. दरम्यान दुसरीकडे शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने कर्मचाºयांकडून माहिती संकलित सुरू केली आहे. एकंदरीत जातवैधता प्रमाणपत्र सादर  करू न  शकलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील कर्मचाºयांच्या  नोकरीवर गंडातराची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, जोपर्यंत शासनाकडून स्पष्ट आदेश येत नाहीत. तोपर्यंत कोणतीच कार्यवाही होणार असल्याची माहिती जि.प. प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.