शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धुळे येथे   दिव्यांगाचे विविध मागण्यांसाठी बेमुदत बिºहाड आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 15:31 IST

आंदोलनात शेकडो दिव्यांगाचा सहभाग

ठळक मुद्देसकाळपासून दिव्यांगाचे आंदोलन सुरूग्रामपंचायत विभागाच्या अधिकाºयांनी आंदोलनकर्त्यांशी केली चर्चाआंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम

आॅनलाइन लोकमतधुळे : ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नातून २०११ ते १७ पर्र्यंतचा तीन टक्के व आता पाच टक्केचा निधी मिळावा, ज्या ग्रामसेवकांनी हा निधी देण्यास टाळाटाळ केली, त्यांची चौकशी करून कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेकडो दिव्यांगानी आज सकाळपासून   जेलरोडवरील क्युमाईन क्लबसमोर बेमुदत बिºहाड आंदोलनास सुरूवात केली आहे. हे आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षातर्फे करण्यात येत आहे. त्याचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. वसंत बोरसे करीत आहेत. शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती व सर्व ग्रामपंचायतींना स्वउत्पन्नातून दिव्यांगासाठी २०११पासून २०१७पर्यंत ३ टक्के तसेच चालू वित्तीय वर्षात पाच टक्के रक्कम राखीव ठेवून त्यांच्यावर त्याच वित्तीयवर्षी खर्च करावा. ग्रामपंचायतीने एखाद्या आर्थिक वर्षात दिव्यांगासाठीचा राखीव निधी खर्च केला नाही तर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अपंग विभागात त्यावर्षीचा निधी जमा करावा असा आदेश आहे. असे असतांनाही जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक त्यानुसार काम करीत नाही. दिव्यांगाना चांगली वागणूक देत नाही. माहिती विचारल्यास उडवा उडवीची उत्तरे देतात. त्यामुळे दिव्यांगाना शाररिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. दिव्यांगावरील अन्याय दूर करण्यासाठी  जिल्ह्यातील शेकडो दिव्यांगानी आज सकाळपासून क्युमाईन क्लबसमोर बेमुदत बिºहाड आंदोलनास सुरूवात केली. अधिकाºयांची भेटदिव्यांगानी बिºहाड आंदोलन सुरू करताच त्याची दखल जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागातर्फे घेण्यात आली. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी यांनी आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधीशी चर्चा केली.  यावेळी समाजकल्याण विभागाच्या अधिकाºयांनीही आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.  मात्र मागण्यामान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे