शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

धुळे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन: १२ उपकरणांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:07 IST

जाधव, वराडे, पाटील, धामळे, प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा शुक्रवारी समारोप झाला. यात  शहरी गटातील प्राथमिक विभागातून शिवम जाधव तर माध्यमिक गटातून तेजस वराडे,  ग्रामीण प्राथमिक गटातून राजश्री पाटील व माध्यमिक गटातून अविनाश धामळे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. दरम्यान १२ उपकरणांची जिल्हास्तरावर निवड झालेली आहे. शिक्षण विभाग पंचायत समिती  धुळे, शहर व ग्रामीण मुख्याध्यापक संघ तसेच शहर व ग्रामीण विज्ञान अध्यापन संघातर्फे  ४४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन   डी.डी.विसपुते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय   येथे  करण्यात आले होते.  ‘जीवनातील आव्हानांसाठी वैज्ञानिक उपाय’ हा ॅविज्ञान प्रदर्शनाचा विषय होता. यात शहर व ग्रामीण भागातून ३२५ उपकरणे मांडण्यात आली होती.स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवारी दुपारी झाला .अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव महेंद्र विसपुते होते. प्रमुख पाहुणे म्हणून  जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या प्राचार्या डॉ. विद्या पाटील, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे, प्राथ.शिक्षणाधिकारी पी.जी शिंदे, मुख्याध्यापक संघाचे अहिरे, सूर्यवंशी, तोरवणे, विनोद रोकडे उपस्थित होते.  विज्ञान प्रदर्शनातील  गटनिहाय अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त  विद्यार्थी  व कंसात शाळेचे नाव असे - प्राथमिक शहरी विभाग- शिवम किरणराव जाधव (श.के. चितळे विद्यालय धुळे), नम्रता महेश बाविस्कर (राजे छत्रपती संभाजी विद्यालय,धुळे), यश संजय पाटील (झेड. बी.पाटील हायस्कूल धुळे). माध्यमिक गट- तेजस दिलीप वराडे (जयहिंद ज्यु.कॉलेज), भार्गव महेश मुळे (कनोसा कॉन्व्हेंट स्कूल), शबनम अल्लाउद्दिन शिकलकर (उर्दू हायस्कूल धुळे). प्राथमिक ग्रामीण- राजश्री संजय पाटील (माध्यमिक विद्यालय कुंडाणे-वेल्हाणे तांडा), कृष्णा सूर्यकांत जाधव (न्यू इंग्लिश स्कूल,नेर), हेमंत संजय कोळी (प्रतिभा माध्य.विद्यालय, वार). माध्यमिक ग्रामीण-अविनाश हिरालाल धामाळे (सोनगीर), लोकेश रवींद्र माळी (न्याहळोद), चेतन देविदास भामरे (मेहेरगाव).शिक्षक गट शहरी प्राथमिक विभाग- किरणचंद्र सी साळुंखे (सीतामाई कन्या विद्यालय, धुळे). माध्यमिक- के.पी. पाटील ( राजीव गांधी विद्यालय,धुळे), आरती सुभाष वाजपेयी (जयहिंद कनिष्ठ महाविद्यालय धुळे). प्राथमिक ग्रामीण- जितेंद्र तानाजी अहिरे (जि.प. प्राथमिक शाळा धाडरी). माध्यमिक- सचिन आनंदराव निकम (माध्य.विद्यालय धामणगाव), एम. बी. मोरे (जवाहर संस्थेचे माध्य. विद्यालय मोराणे).लोकसंख्या शिक्षण विभाग माध्यमिक शहरी विभाग- विशाल जिजाबराव निकम (मयूर हायस्कूल धुळे), द्वितीय- शे. ऐजाज समद (बी.के.शेख उर्दू हायस्कूल). ग्रामीण- उज्वला लक्ष्मण कोकणी (जि.प. शाळा कुंडाणे). व्यवसाय मार्गदर्शन शहरी- अन्सारी रईस अहमद (उर्दू हायस्कूल धामणगाव). ग्रामीण-निलेश अरूण पाटील (माध्य.विद्यालय निमगुळ), महेश पाटील (माध्यमिक विद्यालय धामणगाव.१२ उपकरणांची जिल्हास्तरावर निवडया विज्ञान प्रदर्शनातून धुळे शहर प्राथमिक तीन, माध्यमिक तीन, ग्रामिणचे प्राथमिक व माध्यमिकचे प्रत्येकी तीन-तीन असे १२ उपकरणांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आलेली आहे.दरम्यान विज्ञान प्रदर्शनातील प्रथम तीन क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना  स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. विज्ञान प्रदर्शन यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी पी.के. पारधी, विज्ञान प्रदर्शन समन्वयक समिती सचिव आर.डी.नांद्रे, जे.बी. सोनवणे, सी.टी. पाटील  यांचे सहकार्य मिळाले. तर संयोजनाची जबाबदारी मुख्याध्यापक प्रविण पाटील, प्राचार्य प्रविण भारती यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी  पार पाडली. 

टॅग्स :Dhuleधुळे