शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे तालुक्यात सरपंचपदी कॉँग्रेसचे सात तर भाजपचे सहा उमेदवार विजयी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 13:09 IST

पिंपळनेरला कॉँग्रेसचे माजी सभापती पराभूत

ठळक मुद्देधुळे तालुक्यातील १४ पैकी ७ ग्रा.पं.च्या सरपंचपदी कॉँग्रेसचे तर सहा ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी कुसुंबा या एकमेव ग्रा.पं.वर राष्टÑवादीच्या उमेदवाराची बाजी साक्री तालुक्यात पिंपळनेर येथे कॉँग्रेसचे माजी पं.स.सभापती संजय ठाकरे पराभूत 

आॅनलाईन लोकमत धुळे : तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल गुरूवारी दुपारी १२ वाजेपर्यंत जाहीर झाले. सात ग्रा.पं.वर कॉँग्रेसचे, सहा ग्रा.पं.वर भाजपचे तर एका ग्रा.पं.वर राष्टÑवादी कॉँगै्रसचे सरपंच निवडून आले. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांसह समर्थकांनी जल्लोष साजरा केला. दरम्यान, साक्री तालुक्यातील पिंपळनेर ग्रा.पं.च्या निवडणुकीत कॉँग्रेसचे माजी पं.स.सभापती व जि.प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांचे कट्टर समर्थक संजय ठाकरे पराभूत झाले.बुधवारी जिल्ह्यातील ७४ ग्रा.पं.साठी मतदान घेण्यात आले होते. गुरुवारी सकाळी १० वाजता येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील १४ ग्रा.पं.ची मतमोजणी करण्यात आली. अवघ्या दोन तासांत निकाल जाहीर करण्यात आले. त्यानुसार तालुक्यातील निमगूळ, लामकानी, रानमळा, धाडरी, धाडरे, सौंदाणे व नंदाळे बु।।. या सात ग्रा.पं.वर कॉँग्रेसचे उमेदवार सरपंच म्हणून निवडून आले. तर अनकवाडी, अंचाळे तांडा, नावरी, शिरढाणे प्र.डां., जापी व नाणे या सहा ग्रा.पं.वर भाजपचे उमेदवार सरपंच पदी निवडून आले आहेत. कुसुंबा या तालुक्यातील एकमेव ग्रा.पं.च्या सरपंचपदी राष्टÑवादी कॉँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. तालुक्यातील १६ ग्रा.पं.साठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र माघारीअंती नवलनगर व सातरणे या दोन ग्रा.पं. बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले होते. उर्वरीत १४ ग्रा.पं.साठी मतदान घेण्यात आले होते. जिल्ह्यात एकूण ७४ ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडली.   पिंपळनेर येथे कॉँग्रेसचे माजी सभापती पराभूत साक्री तालुक्यातील पिंपळनेर या सर्वात मोठ्या ग्रा.पं.च्या सरपंचपदासाठी उभे असलेले माजी सरपंच व पंचायत समितीचे माजी सभापती तथा जि.प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांचे कट्टर समर्थक संजय ठाकरे पराभूत झाले. इंदवे ग्रा.पं.च्या निवडणुकीत कॉँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व विद्यमान कृउबा सभापती पोपटराव सोनवणे यांचा उमेदवार पराभूत झाला. तर बल्हाणे ग्रा.पं.च्या निवडणुकीत विद्यमान कॉँग्रेस तालुकाध्यक्ष विलासराव बिरारीस यांचे पूर्ण पॅनल पराभूत झाले. तर राष्टÑवादी कॉँग्रेसचे जितेंद्र बिरारीस यांचे संपूर्ण पॅनल विजयी झाले आहेत. 

 

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक