शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात वर्गात साप सोडणाऱ्या व मुलीची छेड काढणाºया विद्यार्थ्यांना शाळेतून काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 11:25 IST

मुख्याध्यापकांनी पालकांना बोलावून केली अमलबजावणी

आॅनलाइन लोकमतधुळे : वर्गात साप सोडणाºया दोन विद्यार्थ्यांसह मुलीची छेडखानी काढणाºया एकाला अग्रसेन विद्यालयातून दाखला देत शाळेतून काढण्यात आले़ मुख्याध्यापकांनी या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून कारवाई केल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली़ दरम्यान कठोर अशा भूमिकेमुळे अन्य विद्यार्थ्यांवर मोठा वचक निर्माण झाला आहे़साक्री रोडवरील अग्रसेन प्राथमिक विद्यालयातील दोन टवाळखोर नववीच्या विद्यार्थ्यांनी बंद प्लॅस्टिकच्या बरणीतून सर्पमित्र वडिलांनी पकडून आणलेला साप चक्क वर्गात सोडल्याची घटना १५ दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकारामुळे वर्गातील विद्यार्थ्यांची मोठी धांदल उडाली़ घडलेला प्रकार मुख्याध्यापकांपर्यंत पोहचला़ मुख्याध्यापकांनी संबंधित दोघा विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून घेत त्यांनाही हा प्रकार सांगितला.दरम्यान दोघ विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुलांना शाळेतून काढून टाका असे सांगितले. त्यानंतर पालकांकडून तसा अर्ज लिहून घेतला. अर्ज प्राप्त होताच मुख्याध्यापक वाघ यांनी त्या दोघ टवाळखोर विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकले.विद्यार्थिनीची छेड काढणाºया विद्यार्थ्याला दाखविला घरचा रस्ता !तसेच याच शाळेत दुसरी एक घटना घडली आहे़ सातवीच्या विद्यार्थिनीची छेड-नववीचा एक विद्यार्थी काढत होता़ सततच्या जाचाला कंटाळून या विद्यार्थिनीने रौद्ररुप धारण करत छेडखानी करणाºया त्या विद्यार्थ्याला चांगलाच चोप देत खडे बोल सुनावले़ या प्रकारामुळे देखील शाळेत धांदल उडाली होती़ मुख्याध्यापक वाघ यांनी ही बाब गांभिर्याने घेतली़ त्या विद्यार्थ्याच्या पालकाना बोलावून त्याने केलेले गैरवर्तन लक्षात आणून दिले़ त्या विद्यार्थ्याला देखील शाळा सोडल्याचा दाखला देण्यात आला़ यानंतर घडलेली घटना संस्थेच्या अध्यक्षांना सांगितली असता त्यांनी त्या विद्यार्थिनीच्या पालकांना बोलावून घेतले़ सर्व विद्यार्थ्यासमोर तिचा सत्कार करीत ५०० रुपयांचे बक्षिसही दिले़ टवाळखोर विद्यार्थ्यांना धडा शिकवत आत्मसंरक्षण करा असा संदेशही दिला़,असे मुख्याध्यापक एऩ सी़ वाघ, प्राथमिक विभागाचे उपमुख्याध्यापक प्रणव कोठवाल यांनी पत्रकान्वये कळविले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे