शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

धुळे येथील विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरणी खाजगी क्लासचालकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 13:15 IST

दोन जणांविरूद्ध गुन्हा

ठळक मुद्दे अॅट्रासिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अपमानास्पद वागणूक मिळाल्याने आत्महत्या केल्याची तक्रार

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि. 28 - शहरातील बारावीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी उन्नती महाले (17) हीने केलेल्या आत्महत्ये प्रकरणी गिरीष साळुंखे व नरेंद्र महाले या दोघ खाजगी क्लासेस चालकांविरूद्ध पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी 10.30 शहरातील प्रमोदनगर सेक्टर 2 मध्ये उन्नतीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिची मैत्रीण रूमवर आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र संध्याकाळी चर्मकार समाज पदाधिकारी व उन्नतीचे वडील वसंत महाले यांनी पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांची भेट घेऊन या प्रकरणी क्लासेस चालकाकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याने त्या त्रासाला कंटाळून उन्नतीने आत्महत्या केल्याची तक्रार त्यांनी केली. तर कोचिंग क्लासमध्ये लावलेला नीट परीक्षेचा क्लास उन्नतीने बंद केला. त्याचा राग मनात धरून क्लासचालक गिरीष साळुंखे व नरेंद्र महाले यांनी वेळोवेळी क्लासमध्ये सर्वासमोर उन्नतीस अपमानित करून मानसिक त्रास दिला, अशी फिर्याद वसंत महाले यांनी दिली. त्यानुसार रात्री उशीरा दोघा क्लास चालकाविरूद्ध गुरनं136/2017 भादंवि कलम 306 सह अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक सरिता भांड तपास करीत आहेत.