शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपतर्फे धुळे, साक्रीत धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 13:22 IST

तहसीलदारांना निवेदन : महाविकास आघाडी सरकारविरोधात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे/साक्री : शेतकरी विरोधी धोरण, महिला अत्याचार आदी प्रश्नांविरोधात राज्यातील महाविकास आघाडी शासनाच्या निषेधार्थ धुळे व साक्री तालुका भाजपच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.सरकार स्थापन करीत असताना शिवसेनेचे पक्ष प्रमुख व विद्यमान मुख्यमंत्री तसेच काँग्रेस, राष्टÑवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकारने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार रुपये एवढी मदत जाहीर केली होती. पुन्हा सत्तेत आल्यानंतर ही मदत आणखी वाढवू, असेही जाहीर केले होते. या महाविकास आघाडी सरकारने अवकाळीग्रस्त शेतकºयांना प्रतिहेक्टरी ८ हजार रुपयांपेक्षा एक रुपयांचीही अधिक मदत दिलेली नाही. सरसकट कर्जमाफी करु, सातबारा कोरा करु, अशा घोषणा करणाºया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही. महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी योजना शेतकºयांची सरसकट फसवणूक करणारी आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकºयांची फक्त अल्प मुदतीची पीक कर्जे माफ केली आहेत. केवळ पीक कर्जाचा या कर्जमाफीत समावेश केल्याने बहुसंख्य शेतकºयांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. दोन लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकºयांबाबत कर्जमाफी योजनेत कुठलाच उल्लेख नाही. तसेच वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून अशांवर कडक कारवाई करावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.धुळे येथे धरणे आंदोलनात तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, सुभाष देवरे, किशोर सिंघवी, भाऊसाहेब देसले, डॉ.जिजाबराव पाटील, प्रा.डॉ.दत्ता परदेशी, विलास पाटील, किशोर शिंदे, संग्राम पाटील, आशुतोष पाटील, रामकृष्ण खलाणे, विनय परदेशी, मनोहर पाटील, गौरव सैंदाणे, कैलास जाधव, नवलसिंग पवार, पांडुरंग पवार, संजय मराठे, भारत पाटील, गणेश शिंदे, कैलास सोनवणे, भटू तेली, चंद्रशेखर शिंदे, राजेंद्र परदेशी, नितीन शिंदे, दिलीप सुर्यवंशी, आनंदराव पदमर, समाधान पाटील, ज्ञानेश्वर शार्दूल, फकिरा चौधरी, शांताराम पाटील, किशोर पाटील, अनिल भामरे, उमेश पाटील, लक्ष्मण देवरे यांच्यासह धुळे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.साक्री येथे धरणे आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, विलास बिरारीस, राजेंद्र खैरनार, महेंद्र देसले, जि.प. सदस्य विजय ठाकरे, जि.प. सदस्य गोकुळ परदेशी, माजी पं.स. सदस्य रमेश सरक, पंडीतराव पाटील, वेडू सोनवणे, अ‍ॅड.सुरेश शेवाळे, किरण सोनवणे, शैलेंद्र आजगे, उत्पल नांद्रे, हिंमत ठाकरे, चंद्रकांत पवार, साहेबराव बोरसे, दामोदर पगारे, विलास भावसार, मनिषा देसले, बापूसाहेब गीते, लोटन सोनवणे, दिपक भामरे, अनिल देसले, दीपक वाघ, विलास तोरवणे, सुधीर अकलाडे, भूषण ठाकरे, महेंद्र सावंत, प्रकाश नेरकर, महेंद्र देसले, गोकुळसिंह परदेशी, संजय सोनवणे, शाम देवरे, धनराज सोनवणे, गोकुळबाई भामरे, सुमनबाई जाधव, आशाबाई पाटील, कमलबाई गायकवाड, रोहिणी अकलाडे, सुनंदा तोरवणे, प्रशांत शिरसाठ, अ‍ॅड.पुनम काकुस्ते, खंडेराव कर्वे, संजय पाटील, डॉ.मुकुंद बोरसे, विश्वास पवार, चिंतामण बोरसे, संजय शिंदे, अमृत बोरसे, दीपक नांद्रे, योगेश भामरे, राजेंद्र खैरनार, रवींद्र कुंवर, शांताराम जाधव, गजमल कुवर, तुषार ढवळे, संजय नांद्रे, योगेश चौधरी, दिनेश भवरे, संजय मराठे, वसंतराव सोनवणे, रोहिदास महाले, गोरख भदाणे, युवराज महाले, महेंद्र वाणी, प्रकाश मासुळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Dhuleधुळे