शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

धुळे: एसटी आणि कंटेनर भीषण अपघातात १३ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 14:40 IST

बस अपघातातील मृत प्रवाशांच्या वारसांना दहा लाखांची मदत :

 धुळे : दोंडाईचा (ता. शिंदखेडा)- शहादा मार्गावरील निमगूळ गावाजवळ रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास झालेल्या बस व कंटेनर अपघातातील मृतप्रवाशांच्या वारसांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नियमानुसार दहा लाख रुपयांची मदत करण्यात येईल, असे राज्याचे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. दरम्यान, या अपघाताच्या वेळी मंत्री श्री. रावल यांनी मदत कार्यात सहभाग घेतला.

औरंगाबाद- शहादा बसला दोंडाईचा- शहादा मार्गावरील निमगूळ गावाजवळ रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. ८ प्रवासी गंभीर जखमी असून  १४  प्रवाशांना दुखापती झाल्या आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पर्यटन मंत्री श्री. रावल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासमवेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वरीष्ठ अधिकारी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, तहसीलदार सुदाम महाजन, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील घटनास्थळी होते. जखमी व मृतांना रुग्ण वाहिकेतून दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. गंभीर जखमींना धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दोन मृतदेह आणण्यात आले. जखमींमध्ये  मोतीलाल रामदास साठे ( ४८ ) ज्योती मोतीलाल साठे (४०), योगेश मोतीलाल साठे ( १८ ), तुषार मोतीलाल साठे (१३), मुपो लोणखेडा ता.शहादा, शेख शहानाज शेख अमानुद्दीन ( ५० ) शहादा शकिल पिंजारी शहादा,कांतीलाल मुरार हालकरी( ३४ ) शिरूर दिगर ता.शहादा बस वाहक जाकीर दरबार पिंजारी, ( ४०) , जगदीश दत्तात्रय भावसार, ( ३७ ), सुनीता जगदीश भावसार (३५ ), मुमताज इमरान ईराणी, इमरान रशीद ईराणी, ईरम ईमराम ईराणी, सर्व शहादा ता.शहादा.  शेख हारून शेख दगडू ( ३५ ) धुळे, सूरज प्रताप हारदे ( २७ ) ,रईस अब्बास पिंजारी,३७ शिवाजी नगर वडजाई ता धुळे,सागर पांडुरंग वाघमोडे ( २५ ) धुळे, निंबा वनजी चौधरी ( ५४ ) हिराबाई निंबा चौधरी ( ४२ ) मु.पो.डोंगरगाव,ता.शहादा,टिला मुरल्या पावरा वय ( ३५ ) दाऊसिंग पहाडसिंग नाईक ( ३४ ) मु.पो.तोरणमाळ,ता.शहादा महेंद्र बाळू बागल ३५ निमगूळ ता.शिंदखेडा, वितला मुरला पावरा खडकी ,तोरणमाळ ता.शहादा, बंछा हमऱ्या पावरा झापी,तोरणमाळ ता.शहादा,  जाकीर दरबार पिंजारी ३६ मांडळ, ता.शिंदखेडा यांचा समावेश आहे.जखमी प्रवाश्यांवर उपचार सुरु आहेत.मयतांमध्ये बस चालक मुकेश नगीन पाटील वय ( ४० ), वृषाली दिपक भावसार ३५, तेजस जगदीश भावसार ( १४ ) शकील महंमद बागवान, प्रेरणा श्रीराम वंजारी , सौरभ श्रीराम वंजारी, सुयोग बन्सीलाल नहाटा,इद्रीस नासीर मन्यार सर्व राहणार शहादा, संजय ताराचंद अलकारी रा.शिरूड ता.शहादा. हस्तिक आनंद वाघ चौरे ठाणे, सोमनाथ धोंडू पाटील,चाळीसगाव जि.जळगाव.मनीषा महेंद्र बागल ( ३२) निमगूळ, ता शिंदखेडा,यांचा समावेश आहे.आज सकाळी दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात ११   मृतदेहांचे विच्छेदन करुन ते नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रे, डॉ. महेश भडांगे, डॉ. रोहन थोरात आदींनी मृतदेहांचे विच्छेदन केले.  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे मृतांच्या वारसांना दहा लाख रुपयांची मदत करण्यात  येणार आहे याशिवाय मृताच्या वारसांना तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये, तर जखमींना एक हजार रुपयांची मदत दिली आहे. मृत प्रवाशांच्या वारसांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नियमाप्रमाणे दहा लाख रुपयांची मदत करण्यात तसेच बस अपघातातील मृत प्रवाशांच्या वारसांना मंत्री रावल यांनी प्रत्येकी वैयक्तिक दहा हजार रुपयांची मदत केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे