शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

धुळे, नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 22:47 IST

‘खंडपीठाचे जैसे थे’चे आदेश : महाराष्टÑ जि.प.-पं.स. अ‍ॅक्टमध्ये सुधारणा करणार, राज्य सरकारचे खंडपीठात शपथपत्र  

ठळक मुद्देराज्य सरकारतर्फे खंडपीठात शपथपत्र सादर येत्या हिवाळी अधिवेशनात महाराष्टÑ जि.प.-पं.स. अ‍ॅक्टमध्ये सुधारणा तोपर्यंत निवडणुका न घेता ‘जैसे थे’चे खंडपीठाचे आदेश 

आॅनलाईन लोकमत धुळे : धुळे तसेच नंदुरबार जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. खंडपीठाच्या आदेशानुसार राज्य सरकारने बुधवारी म्हणणे सादर केले. त्यानुसार येत्या हिवाळी अधिवेशनात महाराष्टÑ जिल्हा परिषद व पंचायत समिती अ‍ॅक्टच्या कलम १२ मध्ये सुधारणा करण्याचा विचार केला जाईल, असे या शपथपत्रात नमूद केले आहे. त्यामुळे खंडपीठाने तोपर्यंत निवडणुका न घेता ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे आदेश दिले. धुळे, नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रशासनाने गट-गणांची प्रारूप रचना तसेच जागांचे आरक्षण जाहीर केले होते. त्यावर माजी जि.प. सदस्य प्रभाकर भदाणे व प्रकाश भदाणे यांनी आक्षेप घेत त्याविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट व गणाची आरक्षणाची मर्यादा कायद्याच्या निर्देशानुसार ठरलेली असताना प्रशासनाने त्या मर्यादेपेक्षा जास्त आरक्षण काढले. तसेच गट- गणाची रचना करतानाही कायद्याप्रमाणे करण्यात आले नसल्याचे याचिकेत नमूद केले होते.   मंगळवारी या याचिकेवर  सुनावणीवेळी खंडपीठाने आरक्षणाच्या मुद्याबाबत राज्य सरकारला बुधवारी शपथपत्र सादर करावे, असे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी राज्य सरकारतर्फे शपथपत्र देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, विधानसभेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात महाराष्टÑ जिल्हा परिषद-पंचायत समिती अ‍ॅक्टच्या आरक्षणाबाबतच्या कलम १२ मध्ये सुधारण करण्याचा विषय ठेवणार आहोत. अशाच संदर्भातील के. कृष्णमूर्ती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सदर आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक जायला नको, असे आदेश दिले आहेत. ते आपल्याकडे जास्त होते. त्यामुळे या विषयावर विचार करणे गरजेचे आहे. त्यानुसार येत्या हिवाळी अधिवेशनात ते विचारार्थ घेणार असल्याचे राज्य सरकारने त्यात म्हटले आहे. त्यामुळे तोपर्यंत धुळे व नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकांचा विचार करू नये तसेच त्याबाबत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे आदेश खंडपीठाने दिले. त्यामुळे जि.प. निवडणुका लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. या याचिकेचे कामकाज न्यायमूर्ती आर.एम. बर्डे व न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या पीठापुढे चालले. याचिकाकर्ते भदाणे यांच्यातर्फे अ‍ॅड.पी.एम. शहा यांनी काम पाहिले. 

 

टॅग्स :DhuleधुळेCourtन्यायालय