शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील १२१ शेतकºयांकडून ९७९ क्विंटल तुर खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 16:24 IST

दोंडाईचा, शहादा येथे नोंदणी होवूनदेखील एकाही शेतकºयाची अद्याप तुर खरेदी नाही

ठळक मुद्दे१ फेब्रुवारीपासून सुरू झाली तुर खरेदीदोन केंद्रावर नोंदणी करूनही खरेदी नाहीयावर्षी खरेदीचीही मर्यादा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : नाफेडतर्फे २०१७-१८ या हंगामासाठी धुळे-नंदुरबार जिल्ह्यासाठी तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. दोन्ही जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रावर १७ फेब्रुवारीपर्यंत १२१ शेतकºयांकडून ९७९.६० क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या १७ दिवसात दोंडाईचा व शहादा येथे अद्याप एकाही शेतकºयाची तुर खरेदी करण्यात आलेली नाही.गेल्या वर्षाप्रमाणेच यावर्षीही तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. एक फेब्रुवारी २०१८ पासून नाफेडतर्फे धुळे जिल्ह्यात धुळ्यासह शिरपूर, दोंडाईचा येथे तर नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार व शहादा येथे आॅनलाईन तुर खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. शासनाने तुरीला ५ हजार २०० रूपये प्रतिक्विंटल दर व २५० रूपये बोनस असा एकूण ५ हजार ४५० रूपये भाव जाहीर केलेला आहे. खुल्या बाजारपेठेत व्यापारीवर्गाकडून तुरीला अपेक्षित भाव देत नाहीत, म्हणून शेतकºयांना नाफेडच्या खरेदीकेद्रावर तुर विक्रीकडे जास्त कल असतो.आॅनलाईन खरेदीसाठी शेतकºयांना अगोदर नोंदणी करणे गरजेचे आहे.दरम्यान १ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या खरेदी केंद्रांपैकी गेल्या १७ दिवसात सर्वाधिक खरेदी धुळे केंद्रावर झालेली आहे. या ठिकाणी १३५ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली. त्यापैकी ६३ शेतकºयांकडून ५५५. ३० क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आलेली आहे. शिरपूर केंद्रावर ४१ शेतकºयांनी नोंदणी केली. त्यापैकी २२ शेतकºयांची २०८ क्विंटल तुर खरेदी करण्यात आलेली आहे. नंदुरबार खरेदी केंद्रावर ४० शेतकºयांनी नोंदणी केली. त्यापैकी ३७ शेतकºयांकडून २१६.३० क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आलेली आहे.दोन केंद्रावर नोंदणी करून खरेदी नाहीदोंडाईचा येथील केंद्रावर १२ तर शहादा केंद्रावर २८ शेतकºयांनी आतापर्यंत तुरीची नोंदणी केली आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी अद्याप तुरीची खरेदी झालेली नसल्याचे सांगण्यात येते.खरेदीचीही मर्यादाआॅनलाईन प्रक्रिया चांगली आहे. याला शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे  अनेक शेतकरी आॅनलाईन नोंदणी करीत असतात. असे असतांना शासनाने तुर खरेदीची मर्यादा वाढविण्याऐवजी ती घटवलेली आहे. एका दिवसात एका शेतकºयाची केवळ २५ क्विंटल तुर खरेदीची मर्यादा आहे. त्यामुळे तुर खरेदीला ‘ब्रेक’ बसू शकतो, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात अनेक प्रयोगशील शेतकरी असून, ते सरासरीपेक्षा अधिक उत्पन्न घेत असतात. त्यांना या मर्यादेचा फटका बसू शकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.नवीन नियमांची भरदरम्यान यावर्षी तूर खरेदी प्रक्रियेत काही नवीन नियमांची भर पडलेली आहे. दरवेळी तुरीची पोते हे सुतळीच्या साह्याने शिवण्यात येत होती. मात्र यावर्षापासून ती मशीनच्या साह्याने शिवण्यात यावी असे निर्देश संबंधितांना देण्यात आलेले आहेत. यासाठी कोणत्या रंगाचा दोरा वापरावा ते देखील निश्चित करण्यात आलेले आहेत.