शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धुळे मनपाच्या पॅथॉलॉजी लॅब महिन्याभरात सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 13:17 IST

१० महिन्यांपासून प्रस्तावित : सामाजिक संस्थेच्या हातभाराने आरोग्य सेवेचा विस्तार

ठळक मुद्देगेल्यावर्षी मनपाच्या महासभेत झाला होता ठरावप्रस्तावित प्रयोगशाळांची पहाणीनुतनीकरणाचे काम लवकरच पूणॅ होणार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : नागरिकांना अल्पदरात आरोग्य चाचण्या करणे शक्य व्हावे यासाठी मनपा आरोग्य विभाग रोटरी क्लब या  सामाजिक संस्थेच्या सहकार्याने दोन ‘पॅथॉलॉजी लॅब’ सुरू करणार आहे़ आठ महिन्यांपासून प्रस्तावित असलेल्या या ‘पॅथॉलॉजी लॅब’ महिनाभरात सुरू होणार आहेत़ सद्यस्थितीत धुळे महापालिकेच्या सुतिकागृह दवाखाना व देवपूर दवाखाना याठिकाणी प्रत्येकी एक याप्रमाणे दोन प्रयोगशाळा कार्यरत आहेत़ त्यामध्ये करार तत्वावर कार्यरत तंत्रज्ञ काम पाहतात़ या दोन्ही प्रयोगशाळांमध्ये रक्त तपासणी, कावीळ, एड्स यांसारख्या काही मोजक्याच आजारांच्या चाचण्या केल्या जातात़ या आरोग्य चाचण्या मोफत असून त्यांचा लाभ दरमहा ३०० ते ४०० रूग्ण घेत असतात़  देवपूर दवाखान्यात कार्यान्वित असलेल्या प्रयोगशाळेत महिन्याला ५० ते ६० रूग्ण लाभ घेत असून त्यांना प्रत्येकी २० रूपये फी आकारणी केली जाते़ मात्र मनपा आरोग्य विभागाने रोटरी क्लब या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध करून अद्ययावत पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला़ त्यामुळे काही रूग्णांना सर्व आजारांवरील चाचण्या अल्पदरात करणे शक्य होईल़ महापालिकेच्या पॅथॉलॉजी लॅब सुरू झाल्यास नागरिकांना विविध खर्चिक स्वरूपाच्या चाचण्या अल्पदरात करणे शक्य होणार आहे तसेच रिपोर्टही तत्काळ मिळेल़ त्याचप्रमाणे धुळे महापालिकेचे १० अ‍ॅलॉपॅथी दवाखाने, २ सुतिकागृह, १ कुटूंब कल्याण केंद्र, आयुर्वेद पंचकर्म दवाखाना याठिकाणी येणाºया गरीब व गरजू रूग्णांना लॅबचा लाभ होणार आहे़ सदरच्या पॅथॉलॉजी लॅबमधील विविध चाचण्या ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर केल्या जाणार आहेत़ या चाचण्या मानधन तत्वावर कार्यरत प्रयोगशाळा तंत्रज्ञ संस्थेतर्फे दिल्या जाणाºया पॅथॉलॉजिस्ट, तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करणार  आहे़ शहरात मनपाची प्रशस्त प्रयोगशाळा नसल्याने नागरिकांना खासगी प्रयोगशाळांचा आधार घ्यावा लागतो़ खासगी प्रयोगशाळांचे शुल्क महागडे असून ते सर्वसामान्यांना परवडत नाही़‘पॅथॉलॉजी लॅब’साठी प्रस्तावित प्रयोगशाळांची पाहणी नुकतीच केली असून येत्या महिनाभरात नवीन साहित्यासह नुतनीकरणाचे काम पूर्ण करून लॅब सुरू केल्या जातील, असे रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय चांडक यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले़महापालिकेच्या महासभेत गेल्या वर्षीच त्याबाबतचा ठराव झाला असून आरोग्य विभागाने प्रयोगशाळांसाठी रसायने व साहित्य खरेदी केली आहे़