शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे महापालिकेच्या करवसुली पथकाला मोगलाईत दमदाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 12:12 IST

थकबाकी वसुलीवरून वाद, पोलिसात तक्रार नाही

ठळक मुद्दे-दोन लाख थकबाकीच्या करवसुलीवरून मोगलाईत वाद-मनपा प्रशासनाकडून सामोपचाराची भुमिका, गुन्हा दाखल नाही-मनपा पथकाकडून करवसुलीसाठी एक दुकान ‘सील’

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेचे करवसुली पथक शनिवारी साक्री रोडवरील मोगलाई भागात थकबाकीदार मालमत्ताधारकांकडे करवसुलीसाठी गेले असता पथकाला दमदाटी झाल्याची घटना घडली़ मात्र मनपा प्रशासनाने पोलिसात गुन्हा दाखल न करता सामोपचाराची भुमिका घेतली़महापालिकेतर्फे सध्या मार्च महिन्याच्या पार्श्वभूमीवर करवसुलीची धडक मोहिम सुरू करण्यात आली आहे़ त्यानुसार शनिवारी मोगलाई भागातील एका थकबाकीदाराकडे २ लाख २५ हजार रूपयांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी मनपा करवसुली विभागाचे सहायक आयुक्त अभिजीत कदम व पथक गेले होते़ त्यावेळी संबंधित मालमत्ताधारकाचे नळ कनेक्शन तोडण्यासह जप्तीच्या कार्यवाही करण्यावरून पथक व मालमत्ताधारकामध्ये वाद झाला़ त्यावेळी सहायक आयुक्त अभिजीत कदम यांना दमदाटी करण्यात आली़ त्यानंतर मनपा पथकाने शहर पोलिस ठाणे गाठले होते़ परंतु आयुक्तांनी गुन्हा दाखल न करता परतण्याचे आदेश दिल्याने पथकानेही काढता पाय घेतला़ दरम्यान, मोगलाई भागातच अन्यत्र एका मालमत्ताधारकाचे दुकान सील करण्यात आले़ त्यावेळी देखील किरकोळ वाद झाला़ मनपा पथकात सहायक आयुक्त अभिजीत कदम, बळवंत रनाळकर, मधुकर निकुंभे, प्रसाद जाधव, किशोर शिंदे, अनिल जोशी, दिलीप मुसळे यांचा समावेश होता़