शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

धुळे मनपाच्या महासभेत शासनासह मजीप्रावर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 16:36 IST

मल:निस्सारण योजना वर्ग करण्यास विरोध

ठळक मुद्देमनपा हिस्सा टाकण्याशिवाय कोणतेही वाढीव शुल्क द्यावे लागणार असेल तर मनपाचा योजना वर्ग करण्यास तीव्र विरोध असल्याचे रूलिंग महापौर कल्पना महाले यांनी दिले़ मलेरिया विभागात कर्मचारी भरतीवरून सहायक आयुक्तांवर झालेल्या आरोपांमुळे आयुक्तांनी सभात्याग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सदस्य व आयुक्तांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली़

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  शहरासाठी मंजूर झालेल्या भुयारी गटार अर्थात मल:निस्सारण योजना जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करून सलग दुसºया योजनेची वाट लावण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करीत शासनासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर मनपा महासभेत जोरदार हल्लाबोल करण्यात आला़महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी महापौर कल्पना महाले, आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या उपस्थितीत झाली़ शहरासाठी मंजूर झालेली १३१ कोटींची मल:निस्सारण योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्याचे आदेश शासनाने दिले असून त्याबाबतचा ठराव मागविला आहे़ त्यानुषंगाने सदर विषय महासभेच्या विषयपत्रिकेवर घेण्यात आला होता़ सदर योजना वर्ग करण्यास जोरदार विरोध करण्यात आला़ शासनाने राजकारण शिजवून योजना वर्ग करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा सदस्य सतिष महाले यांनी केला़ तर राज्यातील सर्व महापालिकांमध्ये केवळ धुळे मनपाची योजना अन्यत्र वर्ग करून शासनाने मनपाचा अपमान केल्याची टिका सदस्य चंद्रकांत सोनार यांनी केली़ मनपाच्या स्वायत्तेवर शासन घाला घालत असल्याचे सदस्य चंद्रकांत केले म्हणाले़ तर नरेंद्र परदेशी यांनी कायदा शासनाच्या बापाचा आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित करीत शासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली़ संजय गुजराथी यांनी बॅनर झळकावून मजीप्राच्या विविध योजनांची बिकट स्थिती सर्वांसमोर आणली़ याशिवाय मनोज मोरे, विरोधी पक्षनेते गंगाधर माळी, सुभाष जगताप, अमोल मासुळे, कैलास चौधरी यांनी देखील मजीप्राच्या कामावर नाराजी व्यक्त करीत योजना वर्ग करण्यास विरोध केला़