शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

धुळे महापालिका लावणार 20 हजार झाडे

By admin | Updated: June 17, 2017 18:13 IST

20 हजार झाडे लावण्याचा निर्णय घेतला असून तशी मागणी वनविभागाकडे नोंदविली आह़े

ऑनलाईन लोकमतधुळे, दि. 17 - राज्यात 1 ते 7 जुलै या कालावधीत राबविण्यात येणा:या वृक्षलागवड मोहिमेत धुळे महापालिकेला 8 हजार 500 झाडे लावण्याचे उद्दिष्ट असताना मनपाने चक्क 20 हजार झाडे लावण्याचा निर्णय घेतला असून तशी मागणी वनविभागाकडे नोंदविली आह़े  शहरात राबविल्या जाणा:या वृक्षलागवड मोहिमेच्या पाश्र्वभूमीवर आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नुकतीच बैठक घेतली़ या बैठकीत प्रत्येक स्वच्छता निरीक्षक आणि ओव्हरसियर यांना शहरातील मोकळया जागांचे स्थळसव्रेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले असून 20 तारखेर्पयत सविस्तर अहवाल मागविण्यात आला आह़े शहरात वृक्षलागवड करण्यासाठी मनपाने शनिवारी वनविभागाकडे 20 हजार रोपांची मागणी नोंदविली़ सहायक आयुक्त शांताराम गोसावी व अभियंता कैलास शिंदे यांनी वनविभागाच्या अधिका:यांची भेट घेतली़ गेल्या वर्षी मागणीपेक्षा कमी रोपे उपलब्ध झाल्यामुळे खोदून ठेवलेले खड्डे बुजविण्याची नामुष्की महापालिकेवर आली होती़ त्यामुळे मनपा प्रशासनावर टीका झाली होती़ शहरात 35 प्रभाग असून प्रत्येक प्रभागात 600 झाडे लावावीत, असे आदेश आयुक्तांनी दिले असून त्यासाठी नगरसेवक, शाळा, स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आह़े तसेच प्रत्येक वृक्षाचे जीपीएसद्वारे छायाचित्र घेण्याचे आदेश देखील आयुक्तांनी दिले आहेत़ यंदा मनपाला 8 हजार 500 वृक्षांच्या लागवडीचे उद्दिष्ट असतांनाही आयुक्तांच्या आदेशानुसार तब्बल 20 हजार वृक्षलागवडीचा कार्यक्रम मनपाने हाती घेतला आह़े तत्पूर्वी या कामासाठी जेसीबी, टिकम, पावडी व अन्य साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असून रोपे खरेदी, वाहतुकीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आह़े शहरात वृक्षलागवड करण्यासह त्यांच्या संगोपनावर देखील भर द्यावा लागणार आह़े त्यामुळे ज्या भागातील मोकळया जागांवर किंवा रस्त्यांलगत झाडे लावली जातील, त्याठिकाणी वृक्षमित्र नेमून तसेच नागरिकांवर त्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे मनपा सुत्रांकडून सांगण्यात आल़े