शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

धुळे महापालिकेतर्फे सात दिवसांत १ कोटींची करवसुली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 11:33 IST

शास्तीमाफी योजनेत ७ लाख रूपये शास्ती वसुल, कर भरण्यासाठी रांगा

ठळक मुद्देशहर हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये देखील मनपाकडून करवसुली सुरू करण्यात आली आहे़ मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी उन्हात रांगा लावून उभे राहावे लागत असल्याने बँक काऊंटर वाढविणे आवश्यक आहे़ सहामाही कर आकारणीबाबत माहिती नसल्याने नागरिक गोंधळत आहेत़

धुळे : महापालिकेने यंदा सलग तिसºया वर्षी मालमत्ताधारकांना शास्तीमाफी देण्यासाठी अभय योजना जाहीर केली आहे़ त्यानुसार शास्तीमाफी जाहीर झाल्यापासून पहिल्या सात दिवसांत तब्बल १ कोटी रूपयांची करवसुली झाली असून त्यात ७ लाखांच्या शास्तीचा समावेश आहे़महापालिकेने शास्तीमाफी अभय योजनेंतर्गत मालमत्ताधारकांना ५ ते २३ फेब्रुवारी शास्तीत ५० टक्के तर २६ फेब्रुवारी ते ९ मार्च २५ टक्के सवलत जाहीर केली आहे़ शास्तीमाफी योजनेमुळे मनपात कर भरण्यासाठी मालमत्ताधारकांच्या रांगा लागत आहे़पहिला आठवडा लाभदायीशास्तीमाफी योजना लागू झाल्यापासून अर्थात ५ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत मनपाने एकूण १ कोटी ५ लाख ९५ हजार १०८ रूपयांची करवसुली केली आहे़ त्यात २३ लाख ५० हजार १०५ रूपये मागील थकबाकी वसुल झाली असून ३८ लाख ७७ हजार ९४५ रूपये चालू कर वसुल झाला आहे़ रोखीचा भरणा एकूण ६२ लाख २८ हजार ५० रूपये असून धनादेशाव्दारे ४३ लाख ६७ हजार ५८ रूपये कराचा भरणा झाला आहे़ सर्व मिळून एकूण १ कोटी ५ लाख ९५ हजार १०८ रूपयांचा मालमत्ता कर वसुल झाला आहे़ त्यामुळे शास्तीमाफीनंतर पहिलाच आठवडा मनपाला लाभदायी ठरला आहे़ मालमत्ता लिलावासाठी घेणार स्थायीची मान्यतामहापालिकेने मागील व चालू वर्षी सील केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे़ मात्र तत्पूर्वी मालमत्ताधारकांना नियमानुसार नोटीस देऊन मालमत्ता सील केल्यापासून २१ दिवसांची मुदत कर भरण्यासाठी दिली जाणार आहे़ तोपर्यंत मनपाकडून मालमत्तांचे मुल्यांकन करून त्यास स्थायी समितीच्या सभेत मान्यता घेतली जाणार आहे़ ज्या मालमत्तांना जाहीर लिलाव प्रक्रियेत प्रतिसाद मिळणार नाही, त्या नाममात्र शुल्क आकारून मनपाच्या नावाने केल्या जातील़ करवसुलीसाठी ३९ पथकेआयुक्तांच्या आदेशानुसार कर वसुली करण्यासाठी तब्बल ३९ पथके नेमण्यात आली आहेत़ मात्र त्यापैकी बहूतांश पथकाचे सदस्य मनपातच बसून असल्याचे दिसून येते़ त्यामुळे बरीच पथके कागदावरच कार्यरत आहेत़ त्यामुळे धडक कारवाईसाठी पथके नेमून देखील कोणतीही मोठी कारवाई आतापर्यंत झालेली नाही़