शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसात ५२ कोटी रूपये वसुलीचे आव्हान; मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर जप्तीच्या कारवाईचा इशारा

By भुषण चिंचोरे | Updated: March 27, 2023 19:37 IST

तीन दिवसात ५२ कोटी रूपये वसुलीचे आव्हान धुळे महानगरपालिकेसमोर आहे. 

धुळे: आर्थिक वर्ष संपण्यात आले आहे मात्र अद्याप महानगरपालिकेच्या ५२ कोटी रूपयांच्या मालमत्ता कराची वसूली बाकी आहे. महानगरपालिकेच्या वसुली विभागाने ७५ टक्के वसुलीचे लक्ष्य डोळ्यासमाेर ठेवले होते. पण आतापर्यंत केवळ ३३ कोटी रूपयांचीच वसुली झाली आहे.

२०२२ - २३ या आर्थिक वर्षात महानगरपालिका प्रशासनाला एकूण ८५ कोटी दोन लाख रूपये इतका कर प्राप्त होणे अपेक्षित होते. पण केवळ ३३ कोटी ५९ लाख रूपये आतापर्यंत प्राप्त झाले आहेत. शास्ती माफी योजना जाहीर केल्यानंतर वसुली वाढली आहे पण ५२ कोटी रूपये वसूल करण्याचे महानगरपालिकेसमोर आव्हान आहे. दरम्यान, शास्ती माफीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांची शंभर टक्के शास्ती माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जप्तीची कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता कर भरून सहकार्य करावे असे आवाहन मालमत्ता कर वसुली विभागाकडून करण्यात आले आहे.

कारवाईच्या इशाऱ्यानंतरही प्रतिसाद नाही मालमत्ता कर न भरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे. जप्ती मोहीम राबवली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच एक लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या तीनशे मालमत्ताधारकांची नावे वर्तमान पत्रात प्रकाशित करण्यात येतील असे सांगण्यात आले आहे. मात्र तरीही वसुली संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे.

१८ मोबाईल टॉवर केले सील शहरात टॉवर उभारलेल्या मोबाईल कंपन्यांनी मोठ्याप्रमाणात मालमत्ता कर थकवला आहे. त्यांच्यावर वसुली पथकाकडून धडक कारवाई केली जात आहेे. आतापर्यंत शहरातील १८ मोबाईल टॉवर सील करण्यात आले आहेत. तसेच मालमत्ता कर थकविणाऱ्या गाळेधारकांचे गाळे सील करत त्यांना दणका देण्यात आला आहे. वारंवार नोटीस देऊनही थकबाकी न भरणाऱ्या एका राष्ट्रीय बँकेच्या शहरातील शाखेला टाळे ठोकत मोठी कारवाई करण्यात आली होती. ३१ मार्चपर्यंत कर भरणाऱ्या नागरिकांना शंभर टक्के शास्ती माफ केली जाणार आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे. मालमत्ता कर न भरणाऱ्या नागरिकांवर जप्तीची कारवाई करणार आहोत. - मधुकर निकुंभे, अधिक्षक मालमत्ता कर वसुली विभाग

 

टॅग्स :Dhuleधुळे