शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

धुळे कृउबात व्यवहार सुरळीत; आवक कमी

By admin | Updated: June 6, 2017 12:28 IST

शहरातील दुकाने सुरू : भाजीपाल्यांच्या जादा दरामुळे ग्राहक त्रस्त

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि.6 : धुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सुरळीत व्यवहार सुरू होते. परंतु, शेतमालाची आवक खूपच कमी असल्यामुळे येथील बाजारात उपलब्ध असलेला माल जादा किंमतीने विकला जात होता. परिणामी, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागल्याचे चित्र दिसून आले. 
भूईमूग शेंगा व कांद्याची आवक कमी 
मंगळवारी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भूईमूग शेंगाची आवक केवळ 15 क्विंटल तर कांद्याची आवक 400 क्विटंल झाल्याची माहिती बाजार समितीचे प्रभारी सचिव डी. सी. सिसोदीया यांनी दिली. ते म्हणाले, की येथील बाजार समितीत भूईमूग शेंगाची सरासरी 500 क्विंटल तर कांद्याची 4 ते 5 हजार रुपये क्विंटल आवक होत असते. परंतु, शेतकरी संपामुळे सलग सहाव्या दिवशी बाजारात कमी आवक झाल्याची माहिती त्यांनी दिली. 
गुरांचा बाजार भरला; पण प्रतिसाद नाही 
धुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी नियमित गुरांचा बाजार भरला होता. ग्रामीण भागातून काही मोजक्याच शेतक:यांनी गुरे विक्रीसाठी आणली होती. परंतु, अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. 
350 क्विंटल भाजीपाल्याची आवक 
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत आज दिवसभरात केवळ 350 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील शेतक:यांची भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. गेल्या पाच दिवसांपासून केवळ सरकारी 250 ते 300 क्विंटल भाजीपाल्याची आवक होत होती. परंतु, आज भाजीपाल्याची आवक ब:यापैकी झाल्यामुळे दुपारी बारा वाजेर्पयत धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली. 
कांदा मार्केटमध्ये शांतता 
साक्री तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत  पिंपळनेर, जैताणे, दहिवेल येथे कांदा मार्केट आजपासून पूर्ववत सुरू झाले. त्यापाश्र्वभूमीवर साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतक:यांना कांदा विक्रीसाठी आणावा, याउद्देशाने आवाहन करण्यात आले होते. परंतु, शेतकरी संपामुळे कांदा उत्पादक शेतक:यांनी आज दिवसभरात कांदा विक्रीसाठी न नेल्यामुळे येथील बाजारात शुकशुकाट दिसून आला. परिणामी, लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती साक्री कृउबातर्फे देण्यात आली. 
शिंदखेडा व शिरपूर तालुक्यात सुरळीत व्यवहार 
मंगळवारी शिंदखेडा व शिरपूर शहरातील बाजारपेठेत सुरळीत व्यवहार सुरू होता. या दोन्ही शहरातील बाजारपेठेत नेहमीप्रमाणे खरेदीदारांची लगबग दिसून आली. या दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागातील बाजारपेठाही पूर्ववत सुरू होत्या.