शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

धुळे विभागातर्फे पंढरपुरसाठी २०० बसेस सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 11:55 IST

७ ते १३ जुलैपर्यंतचे केले आहे नियोजन

ठळक मुद्देधुळे विभागाच्या आठ आगारांतर्फे बसेस सोडणारविभागाला १ कोटी रूपयाचे उत्पन्न अपेक्षित

आॅनलाइन लोकमतधुळे : विठू नामाचा गजर करीत पालखी-पायी दिंडीत सहभागी होऊन अनेक भाविक ३०० ते ३५० किलोमीटरचा पंढरपूरपर्यंत पायी प्रवास करीत असतात. तर काही भाविक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पंढरपूर गाठून विठूमाऊलीच्या चरणी नतमस्तक होत असतात. माऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची सोय व्हावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभाग यंदा तब्बल २०० बसेस सोडणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिली.आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे यात्रा भरत असते. धुळे-नंदुरबार जिल्ह्यातून हजारो भाविक ‘पांडुरंगा’च्या दर्शनासाठी पंढरपुरला जात असतात. काहीजण पायी तर काहीजण राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पंढरपुरला जाऊन विठ्ठल-रूख्मिणीच्या चरणी नतमस्तक होत असतात. भाविकांच्या सोयीसाठी महामंडळाच्या धुळे विभागातर्फे जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.यावर्षी ७ ते १३ जुलै असे पाच दिवस धुळे, साक्री, नंदुरबार, शहादा, शिरपूर, शिंदखेडा, नवापूर, व दोंडाईचा या आठ आगारातून बसगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. यातून किमान १ कोटी रूपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.धुळे विभागातील बहुतांश बस गाड्या या धुळे येथील मध्यवर्ती बसस्थानकात येणार आहेत. धुळे मालेगाव, मनमाड,कोपरगाव, शिर्डी, राहूरी, अहमदनगर,करमाळा, टेंभुर्णीमार्गे बसेस पंढरपुरला जातील. ज्या गाड्यांमध्ये प्रवाशी संख्या कमी असेल, त्या गाड्यांमध्ये धुळे येथून प्रवाशांना बसविण्यात येणार आहेत. तर नवापूर, साक्री, नंदुरबारच्या काही जादा गाड्या या पिंपळनेर, सटाणा, नाशिकमार्गे पंढरपुरला जाणार आहेत.धुळे विभागातील ३५ अधिकारी, कर्मचारी मॅकॅनिक ८ जुलै पासून पंढरपूर येथे विठ्ठल साखर कारखाना येथे यात्रा बसस्थानकावर जातील. तर पंढरपूरला जाणाºया प्रवाशांसाठी सर्व स्थानकांवर स्वतंत्र शेडची व्यवस्था करण्यात आली आहे.यात्रा प्रमुख म्हणून विभागीय वाहतूक अधिकारी किशोर महाजन हे काम पाहणार असल्याचे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे