बैठकीत ग. स. बँकेवर निवडून आलेल्या सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात आले. याशिवाय जिल्ह्यातील विविध शैक्षणिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने वैद्यकीय बिले, डीसीपीसी योजना, नवीन पेन्शन योजना, अंशतः अनुदानित शाळांना आतापर्यंत न मिळालेली सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम आदीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच येणाऱ्या काळात धुळे जिल्ह्यात शिक्षक भारती संघटनेतर्फे सावित्रीबाई फुले व फातिमा शेख वैद्यकीय कॅशलेस योजना सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तालुकानिहाय नियोजन करण्यात आले. धुळे शहर विनोद रोकडे, अमीन कुरेशी, धुळे तालुका खेमचंद पाकळे, संजय पाटील, साक्री तालुका आबासाहेब पाटील, जयवंत पाटील, शिरपूर तालुका रावसाहेब चव्हाण, शिंदखेडा तालुका सुधाकर पाटील, राजेंद्र पाटील इत्यादी जबाबदारी देण्यात आली आहे. बैठकीला राज्य संघटक, सचिव संघटक, सचिव अश्फाक खाटीक, प्रभारी जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील, विनोद रोकडे, खेमचंद पाकळे, सुधाकर पाटील, रावसाहेब चव्हाण, मुश्ताक अहमद, राजेंद्र पाटील, दीपक पाटील, संजय पाटील, श्रीमती एम. एस. जाधव आदी उपस्थित होते.
धुळे जिल्हा शिक्षक भारती संघटनेची सहविचार सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:38 IST