शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात नुकसान भरपाईसाठी पीक विमा अर्ज भरण्याची कार्यवाही संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 11:46 IST

१ नोव्हेंबरपर्यंत फक्त १९२१ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त, गती वाढविण्याची गरज

आॅनलाइन लोकमतधुळे : गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिप पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाईसाठी पीक विमा अर्ज भरण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. परंतु पीक विमा अर्ज भरण्याची कार्यवाही अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. १ नोव्हेंबरपर्यंत ७६ हजार ८०२ पैकी १ हजार ९२१ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती कृषी उपसंचालक एस.डी. मालपुरे यांनी जिल्हाधिकाºयांना दिली आहे.जिल्ह्यात यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे ४ लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली आहे. त्यात कपाशीची २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे. मात्र गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ३ लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.दरम्यान शासनाच्या निर्देशानंतर कृषी व महसूल विभागाने पंचनामे सुरू केलेले आहेत.जिल्ह्यात २०१९-२० अंतर्गत ७६ हजार ८०२ शेतकºयांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग घेतलेला आहे.मात्र स्थानिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी या योजनेत सहभागी झालेल्या शेतकºयांनी घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत विमा कंपनी किंवा संंबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय, महसूल विभाग, व बॅँकेस विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा असे आवाहन जिल्हा कृषी विभागातर्फे शेतकºयांना करण्यात आले होते. अर्ज प्राप्त झाल्यानंतरच विमा कंपनी पंचनामे करून नुकसान भरपाई देत असते.१ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील फक्त १ हजार ९२१ शेतकºयांचे अर्ज विमा कंपनीकडे प्राप्त झाले होते. अपेक्षेनुसार किमान आतापर्यंत ५० हजारपेक्षा अधिक अर्ज प्राप्त होणे गरजेचे होते.पीक विम्यासाठी अर्ज भरून घेण्याचे प्रमाण अतिशय धीम्यागतीने सुरू असल्याबद्दल जिल्हाधिकाºयांनीही यावेळी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान अर्ज भरण्याच्या कामाला गती देण्यात यावी अशी सूचनाही त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना केली.

टॅग्स :Dhuleधुळे