शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे शासनविरोधात हल्लाबोल आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 18:18 IST

घोषणांनी परिसर दणाणला, विविध मागण्यांचे निवासी उपजिल्हाधिकाºयांना दिले निवेदन 

ठळक मुद्देशिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चाला सुरवातशासनविरोधातील घोषणांनी परिसर दणाणलाशेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शासनाच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ धुळे जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.  शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, हमीभावाचे धोरण जाहीर करण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन  निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले.आग्रा रोडवरील शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चाला सुरवात झाली. पारोळा चौफुली, महानगरपालिकामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चेकºयांनी शासनविरोधात दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणला होता. राष्ट्रवादीतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप-शिवसेना सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेले आहे. अनेक पोकळ आश्वासने देऊन, त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यावसायिक अशा सर्व स्तरामध्ये सरकारबद्दल तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. केंद्र सरकारच्या नोटबंदी व जीएसटीच्या निर्णयामुळे देशाची व राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. राज्याच्या गरजेनुसार आवश्यक असलेले विषय प्राधान्य क्रमाने न घेता, बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग यासारख्या योजनांसाठी राज्याचा महसूल वळविला जात आहे.  राज्यशासनाच्या या अनागोंदी व जनविरोधी कारभाराचा निषेध म्हणून हल्लाबोल आंदोलन करण्यात येत आहे.दरम्यान शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करून, त्यांचा ७/१२ उतारा कोरा करण्यात यावा, हमी भावाचे धोरण जाहीर करण्यात यावे, गुजरातच्या धर्तीवर कापसाला हमीभावावर ५०० रूपये प्रतिक्विंटल बोनस द्यावा, धुळे जिल्ह्यातील पाटचाºयांचे नुतनीकरण करून, शेतीला सिंचनाचा लाभ मिळून द्यावा आदी मागण्यांचा यात समावेश आहे.मोर्चात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, जिल्हाध्यक्ष (शहर) मनोज मोरे, ज्योती पावरा, सुवर्णा शिंदे, रवींद्र पाटील, जि.प. सदस्य किरण पाटील, कमलेश देवरे यांच्यासह जवळपास २०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.