शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील २५ गावांची त्रिसदस्यीय समितीकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 11:35 IST

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण : समितीने ग्रामस्थांशी साधला संवाद

आॅनलाइन लोकमतधुळे : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१९ अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील २५ गावांची तपासणी त्रिसदस्यीय समितीने नुकतीच केलेली आहे. समितीने गावातील स्वच्छता, त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गेल्या ४-५ वर्षात झालेल्या शौचालयांची तपासणी केली. या पाहणीचा अहवाल केंद्र शासनाला सादर करण्यात येवून संबंधित ग्रामपंचायतीला रॅँकीग दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या स्वच्छ व पाणी पुरवठा विभागातून देण्यात आली आहे.केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने स्वच्छता सर्वेक्षण २०१९ अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान जिल्ह्यात १५ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या या सर्वेक्षणात गावातील स्वच्छता व स्वच्छतेशी निगडीत कामांची गुणवत्ता व संख्याबल लक्षात घेऊन, स्वतंत्र संस्थेमार्फत गुणांकन ठरविण्यात येणार आहे. या उपक्रमांची समितीमार्फत पहाणी करण्यात येऊन त्याचा अहवाल केंद्र शासनाला सादर करायचा आहे. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीला रॅँकिग दिली जाणार आहे.या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत त्रिसदस्यीय समितीने ५ ते १४ सप्टेंबर २०१९ या कालावधीत जिल्ह्यातील अजंग, देऊर बुद्रुक, गरताड, विसराणे, जुनावणे, नंदाळे खुर्द, नांद्रे, रावेर, सडगाव, वेल्हाणे, वार, भाडणे, छाईल, धनेर, काकानी, पनखेडा, अबुतबारा, पिंपळनेर, सामोडे, मेथी, विखरण,अजनाड, उखळवाडी, मोहीदे, पिंप्री या गावांना भेटी देवून पहाणी केली. समितीमध्ये शिवकुमार यादव, मनीष नेवे, शुभम जगताप या तिघांचा समावेश होता. समितीने प्रत्येक गावातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, गावात असलेले विविध कार्यालय यांची पाहणी केली. तसेच गावातील समाज मंदिरे, इतर देवतांची मंदिरांची पाहणी केली. स्वच्छ सर्वेक्षणाबाबत गावात किती जनजागृती झाली आहे, याची पहाणी केली, परिसरातील स्वच्छता पाहिली. त्याचबरोबर गेल्या ४-५ वर्षांमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत झालेल्या शौचालयांचीही पाहणी केली. त्यानंतर या समिती सदस्यांनी गावात लोकांशी चर्चा करून त्यांचीही स्वच्छतेबाबत मते जाणून घेतली. समितीने केलेल्या पाहणीचा अहवाल एका अ‍ॅपमध्ये भरून तो केंद्र शासनाला सादर करण्यात येणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे